T20 World Cup 2022: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड या चार संघांनी टी-20 विश्वचषक 2022च्या सेमीफायनलमध्ये धडक दिलीय. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. तर, भारतासमोर इंग्लंडच्या संघाचं आव्हान असणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना 10 नोव्हेंबर रोजी अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. यापूर्वी टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात कोणाचं पारडं जड राहीलं? यावर एक नजर टाकुयात.
कोणाचं पारडं जड?
टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड आतापर्यंत तीन वेळा आमने सामने आलाय. त्यापैकी दोन सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, एक सामना इंग्लडनं जिंकला आहे. या आकडेवारीनुसार, टी-20 विश्वचषकात भारताचं पारडं जडं दिसत आहे.
भारताचा 18 धावांनी विजय ( टी-20 विश्वषक, 2007)
2007 मध्ये प्रथमच भारत आणि इंग्लंड पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकात आमने सामने आले होते. या सामन्यात भारताचा स्टार माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनं स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार ठोकून इतिहास रचला. या ऐतिहासिक सामन्यात भारतानं इंग्लंडचा 18 धावांनी धुव्वा उडवला.
भारताचा इंग्लंडवर तीन धावांनी विजय ( टी-20 विश्वषक, 2009)
2009 साली इंग्लंड आणि भारत यांच्यात दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा सामना खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना खूपच रोमांचक ठरला. मात्र, या सामन्यातही भारतीय संघाचा वरचष्मा पाहायला मिळालं. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा तीन धावांनी पराभव केला.
भारताचा लाजिरवाणा पराभव (टी-20 विश्वषक, 2012)
2012मध्ये इंग्लंड आणि भारतीय संघ टी-20 विश्वचषकात तिसऱ्यांदा एकमेकांसमोर आला. या सामन्यात इंग्लंडनं 2009 च्या टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला आणि सामना 90 धावांनी एकतर्फी जिंकला.महत्वाचे म्हणजे, टी-20 विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात भारत आणि इंग्लंड पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहे. यापूर्वी भारत आणि इंग्लंड नॉक आऊट सामन्यात कधीच आमने-सामने आले नाहीत.
ट्वीट-
हे देखील वाचा-