India vs Pakistan, T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून अगदी रंगतदार सामना पाहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सलामीच्या सामन्यात झालेला चुरशीचा खेळ, मग झिम्बाब्वेने पाकिस्तानला मात दिली, आयर्लंडने इंग्लंडला नमवलं. अशा बऱ्याच हायवोल्टेज सामन्यानंतर आता स्पर्धेची फायनलही तुफान रंगतदार होऊ शकते आणि जागतिक क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) पुन्हा आमने-सामने येऊ शकतात.

कशी होईल भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल?

तर ग्रुप 2 मधून भारत आणि पााकिस्तान हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये गेले आहेत. भारतानं 5 पैकी 4 सामने जिंकून एकूण 8 गुणांसह दिमाखात सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका अखेरच्या सामन्यात नेदरलँडकडून पराभूत झाल्याने पाकिस्तान बांग्लादेशला मात देत सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आता भारत इंग्लंडसोबत आणि पाकिस्तान न्यूझीलंडसोबत सेमीफायनल खेळेल आणि दोघे संघ आपआपले सामने जिंकून फायनलमध्ये आमने-सामने येऊ शकतात.

भारत VS पाकिस्तान Head to Head

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 12 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले. यामध्ये भारतानचं दमदार कामगिरी केली आहे. कारण 12 पैकी 9 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, 3 सामन्यात पाकिस्तानचा संघ जिंकला आहे. टी-20 सामन्यातील आकडेवारी पाहता भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे. 

कधी, कुठे रंगणार सेमीफायनल?

सर्वात पहिली सेमीफायनल पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 9 नोव्हेबर रोजी सिडनीच्या क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. तर त्यानंतर लगेचच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड हा सामना अॅडलेडच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर रंगणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवले जाणार असून त्यापू्वी अर्धातास नाणेफेक होईल.

साखळी सामन्यांअखेर गुणतालिकेची स्थिती?

ग्रुप 1 

टीम

सामने

विजय

पराभव

गुण

नेट रन रेट

न्यूझीलंड(Q)

5

3

1

7

+2.113

इंग्लंड(Q)

5

3

1

7

+0.473

ऑस्ट्रेलिया

5

3

1

7

-0.173

श्रीलंका

5

2

3

4

-0.422

आयर्लंड

5

1

3

3

-1.615

अफगाणिस्तान

5

0

3

2

-0.571

ग्रुप 2

टीम

सामने

विजय

पराभव

गुण

नेट रन रेट

भारत(Q)

5

4

1

8

+1.322

पाकिस्तान(Q)

5

3

2

6

+1.028

दक्षिण आफ्रिका

5

2

2

5

+0.874

नेदरलँड

5

2

2

4

-0.849

बांगलादेश

5

2

3

4

-1.176

झिम्बाब्वे

5

1

3

3

-1.138

हे देखील वाचा-

Hardik Catch Video : एकहाती सामना फिरवण्याची ताकद असणाऱ्या हार्दिकनं एकहाती पकडलेला कॅच पाहिलात का?