टी-20 विश्वचषक 2022: आस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून टी-20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) रंगणार आहे. आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक पहिल्यांदा 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं पाकिस्तानचा पराभव करत पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. तेव्हापासून आतापर्यंत सात टी-20 विश्वचषक स्पर्धा पार पडल्या. यात वेस्ट इंडीजच्या संघानं सर्वाधिक दोन वेळा बाजी मारली. तर, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला प्रत्येकी एक वेळा आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकता आली. त्यानंतर येत्या ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात आठव्यांदा टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. यापूर्वी टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. विशेष म्हणजे, या यादीत भारताचा दोन स्टार फलंदाज आहेत, जे एकट्याच्या जोरावर भारताला सामना जिंकून देण्याची क्षमता ठेवतात.
टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटू महिला जयवर्धने अव्वल स्थानी आहे. त्यानं टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 31 सामन्यात श्रीलंकेच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. ज्यात 39. 07 च्या सरासरीनं आणि 134.74 च्या स्ट्राईक रेटनं 1 हजार 16 धावा केल्या. त्यानंतर यादीत वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल दुसऱ्या क्रमाकावर आहे. त्याच्या नावावर 965 धावांची नोंद आहे. तर, टी दिलशान 897 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, रोहित शर्मा चौथ्या, विराट कोहली पाचव्या, डेविड वॉर्नर सहाव्या, एबी डिव्हिलियर्स सातव्या, शाकीब अल हसन आठव्या, कुमार संगकारा नवव्या आणि पाकिस्तानचा शोएब मलिक दहाव्या क्रमांकावर आहे.
टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे टॉप-10 फलंदाज:
क्रमांक | फलंदाजांचं नाव | संघ | सामने | धावा |
1 | महिला जयवर्धनं | श्रीलंका | 31 | 1016 |
2 | ख्रिस गेल | वेस्ट इंडीज | 33 | 965 |
3 | टी. दिलशान | श्रीलंका | 35 | 897 |
4 | रोहित शर्मा | भारत | 33 | 847 |
5 | विराट कोहली | भारत | 21 | 845 |
6 | डेव्हिड वॉर्नर | ऑस्ट्रेलिया | 30 | 762 |
7 | एबी डिव्हिलियर्स | दक्षिण आफ्रिका | 30 | 717 |
8 | शाकीब अल हसन | बांगलादेश | 31 | 698 |
9 | कुमार संगकारा | श्रीलंका | 31 | 616 |
10 | शोएब मलिक | पाकिस्तान | 34 | 646 |
ऑस्ट्रेलियाच्या रंगणार टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-