Indian Team New Jersey : पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. विश्वचषकाआधी भारतीय संघाची जर्सी लाँच करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे टीम इंडियाची जर्सी निळ्या रंगाची आहे. या जर्सीवर तीन स्टार लावण्यात आले आहे. विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेल्या खास जर्सीचे मुंबईमध्ये अनावरण झालं. त्याचे फोटो समोर आले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. विश्वचषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात होणार आहे.  


टीम इंडियाची जर्सी लाँच - 
पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकाआधी भारतीय संघाची जर्सी लाँच करण्यात आली आहे. रविवारी मुंबईतील एका कार्यक्रमात जर्सी लाँच करण्यात आली आहे. जर्सीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये कर्णधार रोहित शर्मा पोज देताना दिसत आहे. दरम्यान, विश्वचषकाआधी भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरोधात तीन तीन सामन्याची टी 20 मालिका खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये टीम इंडिया मिशन वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.





 
 
जर्सीवर तीन स्टार - 
विश्वचषकासाठी लाँच करण्यात आलेल्या जर्सीवर तीन स्टार आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत तीन विश्वचषक जिंकले आहेत. त्यामुळे जर्सीवर तीन स्टार आहेत. भारताने 1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2007 मध्ये आणि 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारतीय विश्वचषक उंचावला आहे. त्यामुळे भारताच्या जर्सीवर तीन स्टार आहेत. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघ उतरणार आहे.  






टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.


राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.


आस्ट्रेलियाच्या प्रमुख शहरात पार पडणार स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये  16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल