T20 World Cup 2022: सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) खेळल्या गेलल्या सामन्यात भारतानं नेदरलँड्सचा (IND vs NED) 56 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात झंझावाती 56 धावांची खेळी करणारा भारताचा तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) सामनावीराचा पुरस्कार जिंकला. नेदरलँड्सविरुद्ध विजयानंतर सूर्यानं आपल्या खेळीबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच फलंदाजीला जाताना त्याच्या मनात कोणते विचार येत होते हे देखील सांगितलं. यासोबत विराट कोहलीबाबतही (Virat Kohli) त्यानं महत्वाचं भाष्य केलंय.
नेदरलँड्सविरुद्ध विजयानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, "जेव्हा मी फलंदाजीला गेलो होतो, त्यावेळी मी फक्त स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो. परिस्थिती अगदी साधारण होती आणि त्यावेळी मला फक्त खेळाचा वेग वाढवायचा होता. नेदरलँड्ससमोर ठेवलंल लक्ष्य गाठण्यासाठी आम्हाला प्रत्येक षटकात 8-10 धावा करायच्या होत्या. हे लक्ष्य भारतीय गोलंदाज सहज वाचवू शकत होते. या सामन्यात भारतीय संघानं चांगली कामगिरी केली, ज्यामुळं मी खूप आनंदात आहे. कोहलीसोबत फलंदाजी करताना खूप मजा येते. आम्ही दोघे जेव्हा सोबत फलंदाजी सगळ्या गोष्टी स्पष्ट असतात."
सूर्यकुमारची दमदार फलंदाजी
सूर्यकुमार फलंदाजीला आला तेव्हा, भारतीय संघानं दोन विकेट्स गमावून 84 धावा केल्या होत्या. अवघ्या आठ षटकाचा खेळ शिल्लक होता. अशा परिस्थितीत भारताचा सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज होती.सूर्यकुमारनं परिस्थितीनुसार फलंदाजी करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि अवघ्या 25 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी केली. सूर्यकुमारनं विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. सूर्यानं डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
भारताची विजयी घौडदौड
नेदरलँड्सविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतानं 56 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करत भारतानं निर्धारित 20 षटकात दोन विकेट्स गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ 123 धावाच करू शकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, राट कोहली आणि सूर्यकुमार यादवनं अर्धशतकं ठोकली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत नेदरलँडच्या संघाला अवघ्या 123 धावांवर रोखलं. या विजयासह भारत ग्रुप 2 च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे.
हे देखील वाचा-