T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत आजच्या दिवसातील दुसरा सामना झिम्बाब्वे आणि आयर्लंड (ZIM vs IRE) या संघात पार पडला असून झिम्बाब्वेने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये दमदार कामगिरी करत 31 धावांनी सामना जिंकला आहे. यावेळी प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेने 174 धावा स्कोरबोर्डवर लावल्या, पण आयर्लंडचा संघ 20 षटकांत 143 धावाच करु शकल्याने झिम्बाब्वेने 31 धावांनी सामना जिंकला. यावेळी सिंकदर रझा या झिम्बाब्वेच्या स्टार खेळाडूने 82 धावांची तडाखेबाज खेळी केली.


सामन्यात आधी टॉस जिंकत आयर्लंडनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडच्या गोलंदाजीची सुरुवातही चांगली झाली. झिम्बाब्वेचे दोन्ही सलामीवीर 0 आणि 9 असे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर मेधवेरे आणि विल्यम्स यांनी अनुक्रमे 22 आणि 12 धावांची खेळी केली. दरम्यान हे दोघेही बाद झाल्यावर संघाचा स्टार प्लेअर सिकंदर रझा याने 48 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार ठोकत 82 धावा केल्या. ज्याच्या जोरावर झिम्बाब्वेने 175 धावांचे तगडे लक्ष्य आयर्लंडसमोर ठेवले. 20 षटकांत 176 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या आयर्लंडला मात्र हे आव्हान पेलता आलं नाही. कर्टीस कॅम्फरने सर्वाधिक 27 तर डॉकरेल आणि डेलानी यांनी प्रत्येकी 24 धावांचं योगदान दिलं. पण 20 षटकांत आयर्लंड 143 धावाच करु शकल्याने झिम्बाब्वेने 31 धावांनी सामना जिंकला. यावेळी सिंकदर रझा याने ठोकलेल्या दमदार 82 धावांमुळे त्याला प्लॅअर ऑफ द मॅचने गौरवण्यात आलं.












स्कॉटलंडनं वेस्ट इंडीजला दिली मात


या सामन्याआधी झालेल्या स्कॉटलंड विरुद्ध वेस्ट इंडीज (SCO vs WI) सामन्यात वेस्ट इंडीजसारख्या अनुभवी संघाला स्कॉटलंडनं तब्बल 42 धावांनी पराभूत केलं आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर आजचा स्कॉटलंडचा विजयही आश्चर्यकारक आहे. आधी बॅटिंग करत स्कॉटलंडनं वेस्ट इंडीजला विजयासाठी 161 धावांचं लक्ष्य दिले. ज्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ 118 धावा करुन ऑलआऊट झाला ज्यामुळे स्कॉटलंडचा संघ 43 धावांनी सामना जिंकत विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आहे.


हे देखील वाचा-