T20 World Cup 2022: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात आज मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं झिम्ब्बावेचा 71 धावांनी पराभव करत आठ गुणांसह सेमीफायनलमध्ये धडक दिली. दरम्यान, भारत आणि झिम्बाब्बे यांच्यात 10 नोव्हेंबरला टी-20 विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलची पहिली लढत होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज झालेल्या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. भारत- झिम्बाब्वे यांच्यातील लाईव्ह सामन्यादरम्यान एक मुलगा रोहित शर्माला भेटण्यासाठी मैदानात आला, ज्याचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात भारतीय संघ गोलंदाजी करत असताना रोहित शर्माचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी मैदानात शिरला. त्याच्या हातात तिरंगा असून त्यानं रोहित शर्माला भेटण्याची आशा व्यक्त केली. मात्र त्याआधीच मैदानावरील सुरक्षा रक्षकानं त्याला थांबवलं. सुरक्षा रक्षकांशी झालेल्या झटापटीत तो मुलगा खाली पडला. हे पाहताच रोहित शर्मानं त्याच्या दिशेनं धाव घेतली आणि सुरक्षा रक्षकाला त्याला घेऊन जाण्यास सांगितलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. लाईव्ह सामन्यात मैदानात शिरल्यामुळं या चाहत्याला 6.5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय, अशीही माहिती समोर आलीय.
व्हिडिओ-
भारताचं झिम्बाब्वेसमोर 187 धावांचं आव्हान
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात पुन्हा एकदा सूर्याची बॅट तळपल्याची पाहायला मिळाली. झिम्बाब्बेविरुद्ध सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर सूर्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेतली. या सामन्यात सूर्यानं अवघ्या 25 चेंडूत 61 धावांची वादळी खेळी केली. सूर्याच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेसमोर 187 धावांचं लक्ष्य ठेवलं.प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 17.2 षटकात 115 धावांवर गारद झाला. हा सामना भारतानं 71 धावांनी जिंकला. या सामन्यात वादळी अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलंय.
हे देखील वाचा-