T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत सध्या सुपर 12 मध्ये एन्ट्रीसाठी क्वॉलीफायर सामने सुरु आहेत. नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे (WI vs ZIM) सामन्यात वेस्ट इंडीजनं 31 धावांनी विजय मिळवला. ज्यामुळे सुपर 12 मध्ये त्यांच्या एन्ट्रीच्या आशा अजूनही जिवंत आहेत. कारण स्पर्धेतील पहिल्या सामन्यात स्कॉटलंडने त्यांना मात दिली होती, ज्यामुळे आजचा सामना त्यांनी गमावला असता तर त्याचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असतं. पण या करो या मरोच्या सामन्यात वेस्ट इंडीजने विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. सामन्यात वेस्ट इंडीजने 153 रन केले ज्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 122 धावांमध्ये सर्वबाद झाला आणि वेस्ट इंडीजने 31 धावांनी सामना जिंकला.






सामन्यात वेस्ट इंडीजच्या विजयाचा शिल्पकार ठरला युवा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ (alzari joseph). त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत केवळ 16 धावा देत 4 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे वेस्ट इंडीजचा संघ सामना जिंकू शकला. सामन्याचा विचार करता नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी घेतली. ज्यानंतर झिम्बाब्वेने उत्तम गोलंदाजी करत वेस्ट इंडीजला अधिक हात खोलू दिले नाहीत. पण जे चार्ल्स याने 36 चेंडूत 45 धावांची खेळी केली, ज्याला रोवमेन पोव्हेल (28) आणि अकिल हुसेन (23) धावांची साथ दिल्यामुळे वेस्ट इंडीचा संघ 153 धावा करु शकला.


154 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाच्या फलंदाजाना संयमी फलंदाजी करत आली नाही आणि शक्य असणारे आव्हान ते पूर्ण करु शकले नाहीत. सलामीवीर वेस्लेने 23, तर अखेरच्या फळीत लुके जोन्गवेने 29 धावा केल्या. इतर फलंदाजांना टिकून खेळता आलं नाही. स्टार खेळाडू सिंकर रझा हाही 1 फोर आणि 1 सिक्स मारुन 14 धावांवर बाद झाला. ज्यानंतर मात्र झिम्बाब्वेचा संघ 18.2 षटकांत 122 रनच करु शकले ज्यामुळे सामना वेस्ट इंडीज 31 धावांनी जिंकला. 


हे देखील वाचा-


SCO vs IRE T20 WC 2022 : कर्टीस कॅम्फरची स्फोटक खेळी, आयर्लंडचा स्कॉटलंडवर 6 गडी राखून दमदार विजय