Shoaib Akhtar : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचे (T20 World Cup 2022) सामने रंगतदार होत असून आता केवळ तीन सामने शिल्लक आहेत. यामध्ये दोन सेमीफायनलचे सामने आणि त्यानंतर फायनलचा सामना खेळवला जाईल. दरम्यान सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गेले आहेत. ज्यानंतर आता हे दोघे फायनलमध्ये आमने-सामने येणार अशा चर्चा होत आहेत. पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यालाही भारत-पाकिस्तान यांनाच फायनलमध्ये बघायचं असून आधी भारत सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन घरी परतेल असं अख्तर म्हणाला होता.


पाकिस्तानचा संघ भारताकडून मग झिम्बाब्वेकडून पराभूत झाला होता ज्यामुळे त्यांच स्पर्धेतील आव्हान संपेल असंच वाटत होतं. त्यावेळी अख्तरला हा पराभव चांगलाच झोंबला होता, त्याने भारतावर निशाणा साधत, 'पाकिस्तान आता स्पर्धेबाहेर जाणार असेल तर भारतही सेमीफायनलपर्यंतच पोहोचेल आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा घरी परतेल,' असं वक्तव्य केलं होतं. पण आता पाकिस्तानचा संघ स्पर्धेत राहिला असून सेमीफायनलही खेळणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानच फायनलमध्ये यावे असं अख्तर म्हणत आहे. 


अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना हे वक्तव्य केलं आहे. तसंच त्याने भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये गेल्यास आयसीसी आणि ब्रॉडकास्टर्सना मोठा फायदा होईल असं वक्तव्य केलं आहे. तसंच शोएब पुढे म्हणाला, 'आता संपूर्ण पाकिस्तानला असं वाटतं की आमच्या खेळाडूंनी मैदानात उतरून विजय मिळवावा. झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला संधी मिळेल असे मला वाटत नव्हतं, पण पाकिस्तान संघाला संजीवनी मिळाली आहे. ही लॉटरी आहे आणि आता आम्हाला हा विश्वचषक हवा आहे.'


 कशी होईल भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल?


तर ग्रुप 2 मधून भारत आणि पााकिस्तान हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये गेले आहेत. भारतानं 5 पैकी 4 सामने जिंकून एकूण 8 गुणांसह दिमाखात सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका अखेरच्या सामन्यात नेदरलँडकडून पराभूत झाल्याने पाकिस्तान बांग्लादेशला मात देत सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आता भारत इंग्लंडसोबत आणि पाकिस्तान न्यूझीलंडसोबत सेमीफायनल खेळेल आणि दोघे संघ आपआपले सामने जिंकून फायनलमध्ये आमने-सामने येऊ शकतात.


सेमीफायनल वेळापत्रक कसं?


सर्वात पहिली सेमीफायनल पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 9 नोव्हेबर रोजी सिडनीच्या क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. तर त्यानंतर लगेचच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड हा सामना अॅडलेडच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर रंगणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवले जाणार असून त्यापू्वी अर्धातास नाणेफेक होईल.



हे देखील वाचा-


Hardik Catch Video : एकहाती सामना फिरवण्याची ताकद असणाऱ्या हार्दिकनं एकहाती पकडलेला कॅच पाहिलात का?