PAK vs RSA, T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत पाकिस्ताननं नुकताच दक्षिण आफ्रिका संघावर (Pakistan vs South Africa) 33 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळं पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला दिलेलं 185 धावाचं टार्गेट 142 करण्यात आलं आणि ओव्हर्सची संख्या 14 करण्यात आली. अखेर दक्षिण आफ्रिकेचा संघ 108 धावाच करु शकल्याने पाकिस्तान 33 धावांनी विजयी झाला. सामन्यात आधी पाकिस्तानकडून शादाब खान आणि इफ्तिकार अहमदनं अर्धशतकं झळकावली असून गोलंदाजीतही शादाबबरोबर शाहीन आफ्रिदी आणि इतर गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली. 

सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत पाकिस्तान संघानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर पाकिस्तान संघाची सुरुवात तशी खास झाली नाही. त्यांची स्टार जोडी रिझवान आणि आझम अनुक्रमे 4 आणि 6 रन करुन तंबूत परतले. मोहम्मद हॅरीसने 28 आणि शान मसूदने 2 रन केल्यानंतर तोही बाद झाला. ज्यानंतर शादाब खान (52) आणि इफ्तिकार अहमदनं (51) दमदार अशी अर्धशतकं झळकावली. या दोघांच्या फटकेबाजीमुळेच पाकिस्ताननं 185 रन स्कोरबोर्डवर लावले. 

ज्यानंतर 186 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा संयमी खेळी करत होता. पण डी कॉक एकही धाव न करता तंबूत परतल्यामुळे पाकिस्ताननं आघाडी घेतली होती. पाकिस्तानचे गोलंदाज अतिशय भेदक गोलंदाजी करत असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज एक-एक करुन बाद होत होते. 9 ओव्हर झाल्यावर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेनं 69 रन केले होते आणि त्यांचे 4 गडी बाद झाले होते. मग पाऊस थांबल्यावर DLS मेथडनुसार दक्षिण आफ्रिकेसमोर 142 रनचं टार्गेट ठेवण्यात आलं आणि ओव्हर्सची संख्या 14 करण्यात आली. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर कमी षटकांत मोठं लक्ष्य असल्यामुळे अखेर 33 धावांनी ते पराभूत झाले. 

कशी आहे ग्रुप 2 ची गुणतालिका?

पाकिस्तानने हा सामना जिंकल्यावर गुणतालिकेत ते थेट तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. तसंच त्यांचा नेट रनरेटही +1.441 इतका झाल्यामुळं ते स्पर्धेत मजबूत स्थितीत आले आहेत. भारत अव्वलस्थानी असला तरी नेटरनरेटच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या मागे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. हे तीन संघच सेमीफायनलच्या शर्यतीत पुढे असून नेदरलँड, झिम्बाब्वे यांचं आव्हान जवळपास संपलं आहे. बांगलादेशचंही पुढे पोहोचणं अवघड आहे. 

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 भारत 4 3 1 0 6 +0.730
2 दक्षिण आफ्रिका 4 2 1 1 5 +1.441
3 पाकिस्तान 4 2 2 0 4 +1.117
4 बांगलादेश 4 2 2 0 4 -1.276
5 झिम्बाब्वे 4 1 2 0 3 -0.313
6 नेदरलँड्स 4 1 3 0 2 -1.233

हे देखील वाचा-