AUS vs AFG T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत आजच्या दिवसातील दुसरा सामना यजमान संघ ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान (Australia vs Afghanistan) यांच्यात खेळवला गेला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी विजय मिळवत सेमीफायनलच्या शर्यतीतील आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं सामना गमावला असला तरी त्यांनी दिलेली अखेरच्या चेंडूपर्यंतची झुंज वाखाणण्याजोगी होती. खासकरुन राशीद खाननं 23 चेंडूत नाबाद 48 रन केले पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आधी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने दिलेलं 169 धावाचं आव्हान पार करतान अफगाणिस्तानचा संघ 20 ओव्हरमध्ये 164 धावाच करु शकला.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत अफगाणिस्तान संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. अफगाणिस्तानची गोलंदाजी त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला कमी धावांत रोखून मग निर्धारीत लक्ष्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचा डाव अफगाणिस्तानचा होता. त्यांनी सुरुवातही चांगली केली. पण मिशेल मार्शने 45 आणि ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने 168 रन स्कोरबोर्डवर लावले.
ज्यानंतर 169 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांना खास कामगिरी करता येत नव्हती. सलामीवीर गुरबाजने 30, इब्राहीम झद्रानने 26 आणि गुलाबदीन नाईबने 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण ते संघाला विजयापर्यंत घेऊन जावू शकले नाहीत. अखेर स्टार ऑलराऊंडर राशीद खानने नाबाद 48 धावांची तुफानी खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यापासून तो अवघ्या 4 धावांनी कमी पडला. ज्यामुळे सामना अफगाणिस्तानने 4 धावांनी गमावला.
कशी आहे ग्रुप 1 ची गुणतालिका?
सुपर-12 ग्रुप 1
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | गुण | नेट रनरेट |
1 | न्यूझीलंड | 5 | 3 | 1 | 1 | 7 | +2.113 |
2 | ऑस्ट्रेलिया | 5 | 3 | 1 | 1 | 7 | -0.173 |
3 | इंग्लंड | 4 | 2 | 1 | 1 | 5 | +0.547 |
4 | श्रीलंका | 4 | 2 | 2 | 0 | 4 | -0.457 |
5 | आयर्लंड | 5 | 1 | 3 | 1 | 2 | -1.165 |
6 | अफगाणिस्तान | 5 | 0 | 2 | 2 | 2 | -0.718 |
हे देखील वाचा-