T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील महामुकाबल्यात काल भारतानं पाकिस्तानचा (India vs Pakistan) चार विकेट्स राखून पराभव केला. या रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) सोबत घेऊन भारताच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीनं बुडती वाचवत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्यानं महत्वपूर्ण 53 चेंडूत नाबाद 83 धावांची खेळी केली. या रोमहर्षक सामन्यानं व्ह्यूवरशिपचे  (Viewership) सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.  डिस्ने प्लस हॉटस्टारवर 18 कोटी लोकांनी भारत-पाकिस्तान सामना एकत्र पाहिला, हा एक नवा विक्रम आहे. भारतात हा सामना स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित करण्यात आला होता.


महत्वाचं म्हणजे, किती लोकांनी हा सामना लाईव्ह पाहिला? याचे आकडे अद्याप समोर आले नाहीत. एका आठवड्यानंतर टेलिव्हिजन प्रेक्षक मापन संस्था ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलद्वारे डेटा जारी केला जाईल. त्यानंतरच भारत- पाकिस्तान सामना किती लोकांनी लाईव्ह पाहिला? हे स्पष्ट होईल. परंतु, डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारचे आकडे कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आशिया चषक 2022 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला सामना तब्बल 1.4 कोटी लोकांनी डिस्ने प्लस हॉटस्टार लाईव्ह पाहिला होता.


तब्बल 1.8 कोटी चाहत्यांनी सामना लाईव्ह पाहिला
डिस्ने प्लस हॉटस्टारवर 1. 8 कोटी लोकांनी भारत-पाकिस्तान सामना पाहिलाय. जेव्हा भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं सामन्याचा पहिला चेंडू टाकला, त्यावेळी 36 लाख लोक पाहत होते. तर, पाकिस्तानचा डाव संपला तेव्हा हा आकडा 1.1 कोटी इतका होता. तर इनिंग ब्रेक दरम्यान हा आकडा 1.4 कोटीवर गेला. जेव्हा टीम इंडिया धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा 40 लाख लोक लाइव्ह स्ट्रीमिंग पाहत होते. मात्र, जेव्हा रवीचंद्रन अश्विननं शेवटची धाव घेतली तेव्हा 1.8 कोटी लोक लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे सामना पाहत होते.


रोमहर्षक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर चार विकेट्सनं विजय 
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजी करत कर्णधाराचा निर्णय असल्याचं सिद्ध केलं. पाकिस्ताननं 20 षटकात आठ विकेट्स गमावून 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना चार विकेट्सनं जिंकला.


हे देखील वाचा-