World Cup 2023: भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) आगामी वन डे विश्वचषकासाठी अॅम्बॅसेडर (Global Ambassador For ICC World Cup) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल  (ICC) म्हणजे आयसीसीच्या वतीनं ही घोषणा करण्यात आली. आगामी विश्वचषकाचा सलामीचा सामना हा गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांमधल्या या सामन्याआधी आयसीसी विश्वचषकासोबत मैदानात उतरण्याचा आणि विश्वचषक स्पर्धेचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करण्याचा मान आयसीसीकडून सचिन तेंडुलकरला देण्यात आला आहे. 


सन 1987 सालच्या विश्वचषकात सचिनचा बॉलबॉय म्हणून प्रवास सुरू झाला होता. त्यानं कारकीर्दीत सहा विश्वचषकांत भारताचं प्रतिनिधित्व केलं असून, 2011 सालच्या भारताच्या विश्वचषक विजेत्या संघात सचिनचा समावेश होता.   


सचिन विश्वचषकाचं उद्घाटन झाल्याचं करणार जाहीर 


गुरुवारी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर विश्वचषक ट्रॉफीसह मैदानात उतरेल आणि स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचं घोषित करेल. तेंडुलकरने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, '1987 मध्ये बॉलबॉय पासून  ते सहा स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत विश्वचषकाचे माझ्या हृदयात नेहमीच विशेष स्थान राहिले आहे. 2011 मध्ये विश्वचषक जिंकणे हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात अभिमानास्पद क्षण होता.


युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल


सचिन तेंडुलकरने सांगितलं की, विश्वचषकासारख्या स्पर्धा युवा खेळाडूंना खूप प्रेरणा देतील. भारतात होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत अनेक मातब्बर संघ आणि खेळाडू जोरदार मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. या महान स्पर्धेची मी आतुरतेने वाट पाहत आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धा युवा खेळाडूंना प्रेरणा देतात. मला आशा आहे की यावेळी ही स्पर्धा तरुण मुली आणि मुलांना खेळात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या देशाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करण्यास प्रेरित करेल.


विश्वचषकातील सर्वात यशस्वी फलंदाज


सचिन तेंडुलकरने वयाच्या 19 व्या वर्षी पहिला विश्वचषक खेळला होता. जेव्हा त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. विश्वचषक स्पर्धेत 2,000 हून अधिक धावा करणारा सचिन हा एकमेव फलंदाज आहे. एकाच विश्वचषकात सर्वाधिक 663 धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे.


भारतात होणाऱ्या विश्वचषकातील पहिला सामना हा 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. 


ही बातमी वाचा: