T20 World Cup 2022 Final: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) सामना खेळला गेला.  या रोमहर्षक सामन्यात भारतानं चार विकेट्सनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताच्या दमदार कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात असताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) यंदाच्या टी-20 विश्वचषकात अंतिम सामना खेळणाऱ्या दोन संघाची भविष्यवाणी केलीय. या स्पर्धेत भारतानं एक सामना जिंकला आहे. तर, पाकिस्तानच्या संघानं एक सामना गमावला आहे. परंतु, हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येतील, जो टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना असेल.  बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा भारताला नक्कीच हरवेल, असंही त्यानं म्हटलंय.

शोएब अख्तरच्या मते, ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. सुपर-12 फेरीच्या दोन्ही गटात प्रत्येकी सहा-सहा संघाचा समावेश करण्यात आलाय. या दोन गटातून प्रत्येकी दोन-दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.  भारत आणि पाकिस्तान हे दोघेही गट-2 मधून उपांत्य फेरीत पोहोचल्यास त्यांची स्पर्धा गट-अ मधील दोन अव्वल संघांशी होईल, याचा अर्थ उपांत्य फेरी भारत आणि पाकिस्तानमध्ये होऊ शकत नाही. 

2007 च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती होणार का?
आयसीसीच्या पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडले होते. अतिशय रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानला नमवून टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं होतं. त्यावेळीही भारत पाकिस्तान एकाच गटात होते. यामुळं यंदाच्या टी-20 विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भारताचं टी-20 विश्वचषकातील वेळापत्रक:

सामना विरुद्ध संघ तारीख वेळ ठिकाण निकाल
पहिला सामना पाकिस्तान 23 ऑक्टोबर दुपारी 1.30 वा. मेलबर्न विजय
दुसरा सामना नेदरलँड्स 27 ऑक्टोबर दुपारी 12.30 वा. सिडनी -
तिसरा सामना दक्षिण आफ्रिका 30 ऑक्टोबर दुपारी 4.30 वा. पर्थ -
चौथा सामना बांग्लादेश 2 नोव्हेंबर दुपारी 1.30 वा. अॅडिलेड -
पाचवा सामना झिम्बाब्वे 6 नोव्हेंबर दुपारी 1.30 वा. मेलबर्न -


हे देखील वाचा-