T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध थरारक विजयानंतर भारतीय संघ गुरुवारी (27 ऑक्टोबर) नेदरलँडशी (IND vs NED) दोन हात करणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) हा सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रेंनी (Paras Mhambrey) युवा गोलंदाज अर्शदीप सिंहच्या (Arshdeep Singh) कामगिरीचं कौतूक केलं. अर्शदीप सिंहकडं दबावातही चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, असा विश्वास म्हांब्रे यांनी व्यक्त केलाय. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीपनं कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना स्वस्तात माघारी धाडलं . त्यानंतर असिफ अलीलाही मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत भारताच्या विजयाचा पाया रचलाय.


अर्शदीपबद्दल बोलताना म्हांब्रें म्हणाले, “गेल्या काही वर्षांतील अर्शदीपची कामगिरी पाहता, मला वाटतं की त्याच्यावर विरोधी संघावर दबाव निर्माण करण्याची तसेच दबावातही चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्यानं आयपीएलमध्ये खूप मेहनत घेतलीय. तो भारतीय संघासाठी पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करतो. त्यांनी दाखवलेला संयम म्हणजे त्याच्या विचारप्रक्रियेची स्पष्टता आहे. अर्शदीपनं त्याच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार बघितले. परंतु, आशिया चषकानंतर त्याच्या गोलंदाजीमध्ये वेगळीच धार पाहायला मिळाली. दबावात चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता दाखवली. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्यानं ज्याप्रकारे गोलंदाजी केली, त्याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. आमचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्याचं भविष्य चागलं आहे."


ट्वीट-






 



कोणत्याच खेळाडूला विश्रांती नाही
भारत उद्या नेदरलँड्सविरुद्ध टी-20 विश्वचषकातील दुसरा सामना खेळेल. या सामन्यात हार्दिक पांड्यासह अनेक खेळाडूंना विश्रांती दिली जाईल, अशी शक्यता होती. मात्र, पारस म्हांब्रे यांनी कोणत्याही खेळाडूला विश्रांती दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. "भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. हा फॉर्म कायम ठेवण्यासाठी आम्हाला प्रत्येक खेळाडूची गरज आहे. ज्यांना फलंदाजीची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी हा गेम टाईम आहे. कोणत्या खेळाडूला विश्रांती द्याचची आहे, याचा आम्ही विचार करत नाहीत. हार्दिक पांड्या संघातील महत्वाचा खेळाडू आहे. त्यानं फलंदाजीसह गोलंदाजीतही योगदान दिलं आहे", असंही म्हांब्रे म्हणाले आहेत.


पाकिस्तानविरुद्ध सामन्यात हार्दिकचाही मोलाटा वाटा
विराट कोहलीनं सामन्याच्या शेवटपर्यंत झुंज दिली आणि भारताला विजय मिळवून दिला. पण या सामन्यात हार्दिक पांड्यानंही महत्वाची भूमिका बजावली. भारताच्या विजयाचं श्रेय हार्दिकला मिळायला हवं. जेव्हा हार्दिक फलंदाजीसाठी गेला, त्यावेळी भारतानं चार महत्वाचे विकेट्स गमावले होते. यातून सावरण कोणत्याही संघासाठी कठीण असतं. पण तरीही त्यानं संयम दाखवत भारताला झोळीत विजय टाकला, असंही त्यांनी म्हटलंय.


हे देखील वाचा-