Viral Video: आयसीसी टी-20 विश्वचषक 2022च्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर एका चाहत्यानं केलेली कमेंट पाहून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरम (Wasim Akram) चांगलाच भडकला. पाकिस्तानमधील एका स्पोर्ट्स चॅनलवर लाइव्ह चर्चेदरम्यान हा प्रकार घडला. संबंधित चाहत्यानं ट्विटरद्वारे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीबाबत खालच्या पातळीवर जावून टीका केली, जे पाहून वसीम अकरमला राग अनावर झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.


शाहीन आफ्रिदीला 14 व्या षटकात ब्रुक्सचा झेल घेताना दुखापत झाली. त्यानंतर इंग्लंडच्या डावातील 16व्या षटकात कर्णधार बाबर आझमनं शाहीनं आफ्रिदीकडं चेंडू सोपावला. त्यावेळी वाटले की त्याची दुखापत फारशी गंभीर नाही. मात्र, षटकाचा पहिलाच चेंडू टाकल्यानंतर शाहीनला पुढे गोलंदाजी करता येणार नाही याची जाणीव झाली. त्यानं षटक अर्धवट सोडून ड्रेसिंग रूम गाठली. अखेर इंग्लंडनं हा सामना पाच विकेट्सनं जिंकला. यानंतर पाकिस्तानी चाहत्यानं ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. "एक नवाज शरीफ पळकुटा होता आणि एक शाही शाह. शाहीन तू आणखी पाच चेंडू टाकायला हवे होते. पण तू मैदानाबाहेर पळून गेलास. यापेक्षा मोठा इव्हेंट असूच शकत नाही. यापेक्षा तुझं प्रेत मैदानाबाहेर आलं असतं तर बरं झालं असतं. मैदानात मरण पावला असतास तर शहीद म्हटलं गेलं असतं. किमान पळकुटा तर म्हटलं गेलं नसतं."


व्हिडिओ-




 


वसीम अकरम संतप्त प्रतिक्रिया
पाकिस्तानी चाहत्याचं ट्वीट पाहून वसीम अकरम चांगलाच भडकला. आपण स्वत:च आपल्या खेळाडूबाबत अशी वक्तव्य करू लागलो तर कसं व्हायचं? असं वसीम अकरमनं म्हटलंय. तसेच जो कोणी हे ट्वीट करणारा आहे, त्यांनं चुकनंही माझ्यासमोर येऊ नये, असा इशाराही वसीम अकरमनं दिलाय.


पाकिस्तानचा टी-20 विश्वचषकातील प्रवास
पाकिस्तानसाठी टी-20 विश्वचषक 2022 चा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. सुपर-12 मध्ये भारत आणि झिम्बाब्वेविरुद्धचे पहिले दोन सामने पाकिस्ताननं गमावले. त्यानंतर कसा तरी उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. त्यानंतर न्यूझीलंडला हरवून अंतिम फेरी गाठली. पण अंतिम फेरी पाकिस्तानला इंग्लडकडून पाच विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला.


हे देखील वाचा-