T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्धच्या थरारक विजयानंतर भारतीय संघाचा (Team India) दुसरा सामना नेदरलँड्ससोबत (IND vs NED) सिडनीमध्ये (Sydney) होणार आहे. मात्र, यापूर्वी भारतीय संघ आयसीसीवर नाराज असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांत झळकत आहे. भारतीय संघाला सराव सत्रानंतर ब्रेकफास्टमध्ये फक्त सँडविच दिलं गेलं. परंतु, खेळाडूंनी हे सँडविच खाण्यास नकार देत त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं. पीटीआय या वृत्तसंस्थेनं याबाबत माहिती दिली.

नेदरलँडविरुद्ध सामन्यापूर्वी मंगळवारी भारतीय संघाचं सराव सत्र पडले. हा ऑप्शनल होता. यामुळं काही खेळाडूंनी या सराव सत्रात सहभाग घेतला नाही. मंगळवारी सराव सत्रानंतर भारतीय संघाला सँडविच देण्यात आले. ही काय बहिष्कार टाकण्यासारखी गोष्ट नाही. परंतु, एवढ्या मोठ्या सरावानंतर प्रत्येक खेळाडूला पोटभर जेवण करायचं होतं आणि त्याची आवश्यकताही होती, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिली.

ट्वीट-

 

इतर संघासाठीही सारखाच मेन्यू
टी-20 विश्वचषक आयसीसीचा इव्हेंट आहे. या स्पर्धेदरम्यानची सराव सत्रे आणि इतर गोष्टींची सोय करणं, हे आयसीसीचं काम आहे. वादाची ठिणगी पडलेल्या ब्रेकफास्टची व्यवस्था आयसीसीनंच केली असून सर्व संघांसाठी सारखाच मेनू आहे. अशा स्थितीत भारतीय संघालाही तेच मिळालं आहे.

भारतीय संघ व्यवस्थापनाची आयसीसीकडं तक्रार
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, "दोन तासांच्या प्रशिक्षणानंतर तुम्ही फक्त थंड सँडविच, एवोकॅडो, काकडी आणि टोमॅटो खाऊ शकत नाही. एवढेच नाही तर सराव सत्रासाठी मिळालेल्या हॉटेलपासून दूर मिळालेल्या जागेमुळंही भारतीय संघ नाराज होती. त्यामुळं त्यांनी त्याच दिवशी सराव करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी टीम इंडियाच्या व्यवस्थापनानं आयसीसीकडे अधिकृत तक्रार केली आहे.

भारताचं टी-20 विश्वचषकातील वेळापत्रक:

सामना विरुद्ध संघ तारीख वेळ ठिकाण निकाल
पहिला सामना पाकिस्तान 23 ऑक्टोबर दुपारी 1.30 वा. मेलबर्न विजय
दुसरा सामना नेदरलँड्स 27 ऑक्टोबर दुपारी 12.30 वा. सिडनी -
तिसरा सामना दक्षिण आफ्रिका 30 ऑक्टोबर दुपारी 4.30 वा. पर्थ -
चौथा सामना बांग्लादेश 2 नोव्हेंबर दुपारी 1.30 वा. अॅडिलेड -
पाचवा सामना झिम्बाब्वे 6 नोव्हेंबर दुपारी 1.30 वा. मेलबर्न -

 

हे देखील वाचा-