T20 World Cup 2022: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात रविवारी टी-20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या टीम इंडियाला झिम्बाब्वेविरुद्ध विजयाची नोंद करून अंतिम चारमध्ये पोहोचायचे आहे. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ प्रथमच आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात झिम्बाब्वेचा संघ विजय मिळवून भारताच्या अडचणीत भर घालण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे. दरम्यान, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना कधी, कठं खेळला जाईल? हे पाहुयात.


भारतीय संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. 3 सामन्यांतील विजयासह टीम इंडियाने सहा गुणांची कमाई केलीय आणि ग्रुप 'अ' च्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वेच्या संघानं मागील चार सामन्यांपैकी एकच सामना जिंकला आहे. तर, दोन सामन्यात पराभव पत्कारला आहे. याशिवाय, त्यांचा एक सामना पावसामुळं होऊ शकला नाही. झिम्बाब्वेचा संघ 3 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.


कधी, कुठं पाहणार सामना?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 6 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तर, अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल, जिथे विविध भाषांमध्ये कॉमेन्ट्री ऐकायला मिळू शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकतात. तसेच टी-20 विश्वचषकाच्या संबंधित ताज्या बातम्या वाचण्यासाठी तुम्ही एबीपी माझावर वेबसाईटवर भेट देऊ शकतात.


भारताचा संभाव्य संघ-
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह. 


झिम्बाब्वेचा संभाव्य संघ-
 वेस्ली मधवेरे, क्रेग एर्विन (कर्णधार), रेगिस चकाब्वा (विकेटकीपर), सीन विल्यम्स, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, रिचर्ड नगारावा, तेंडाई चतारा, आशीर्वाद मुझाराबानी. 


हे देखील वाचा-