T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानच्या संघानं न्यूझीलंडचा (PAN vs NZ) सात विकेट्सनं धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिलीय. त्यानंतर आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 1.30 वाजता अॅडिलेड मैदानावर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघानं दमदार कामगिरी बजावलीय आहे. यामुळं आजचा सामना अतिशय रोमहर्षक ठरू शकतो. दरम्यान, भारताविरुद्ध धोकादायक ठरू शकतात, इंग्लंडच्या अशा पाच खेळाडूंची नावं जाणून घेऊयात.
क्रिस जॉर्डन
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळं भारताविरुद्ध सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी क्रिस जॉर्डनचा संघात समावेश केला जाऊ शकतो. जॉर्डन हा इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याची आकडेवारी चांगली आहे. जॉर्डननं भारताविरुद्ध खेळलेल्या 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत. त्याचे हे आकडे भारतीय संघासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.
जोस बटलर
इंग्लंडच्या संघाचा कर्णधार जोस बटलर त्याच्या तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातोय. तसेच इंग्लंडकडून भारताविरुद्ध सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. अशा स्थितीत त्याला भारतीय संघाच्या कमकुवतपणाची चांगलीच माहिती असेल. फलंदाजीसोबतच बटलर कर्णधार म्हणूनही भारतासाठी काळ ठरू शकतो.
सॅम करन
इंग्लंडच्या संघाचा स्टार ऑलराऊंडर सॅम करननं यंदाच्या टी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी करून दाखवली आहे. टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफानयलमध्ये सॅम करन भारतासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे, डावखुरा गोलंदाजासमोर भारतीय संघ नेहमीच संघर्ष करताना दिसलाय. सॅम करनं या स्पर्धेच्या चार डावात 14.4 च्या सरासरीनं 10 विकेट्स घेतल्या आहेत.
बेन स्टोक्स
जगभरातील घातक ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये बेन स्टोक्सची गणना केली जाते. परंतु, यंदाच्या टी-20 विश्वचषकात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत स्टोक्सनं चार सामन्यात 19.33 च्या सरसरीनं फक्त 58 धावा केल्या आहेत. तर, 12.20 च्या सरासीनं पाच विकेट्स घेतल्या आहेत. पण भारताविरुद्ध बेन स्टोक्स नेहमीच आक्रमक फलंदाजी केलीय.
मोईन अली
इंग्लंड संघाचा फिनिशर असलेल्या मोईन अलीकंड बॅटीसह चेंडूनंही चमत्कार करण्याची क्षमता आहे. मोईन अली काही चेंडूंमध्ये सामन्याचा रुप बदलू शकतो. मात्र, यंदाच्या टी-20 विश्वचषकात मोईन अलीची बॅट शांत दिसली. त्यानं चार सामन्यात केवळ 19 च्या सरासरीनं 38 धावा केल्या आहेत. पण भारताविरुद्ध सामन्यात फॉर्म गवसण्याचा मोईन अलीचा प्रयत्न असेल.
हे देखील वाचा-