IND vs AUS, WT20 Live Score : भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक
India vs Australia Live Score : टी 20 विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.
भारताचा पाच धावांनी पराभव, ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक
भारताला आठवा धक्का, राधा यादव बाद
स्नेह राणाच्या रुपाने भारताला आणखी एक धक्का बसला आहे. भारताला विजयासाठी सहा चेंडूत 16 धावांची गरज
ऋचा घोषच्या रुपाने भारताला सहावा धक्का बसला.
मोक्याच्या क्षणी हरमनप्रीत कौर बाद झाली. अर्धशतकानंतर हरमनप्रीत बाद झाली. भारताला विजयासाठी 32 चेंडूत 40 धावांची गरज आहे.
जम बसेलेली जेमिमा बाद झाली आहे. भारताला हा चौथा धक्का होय. जेमिमाने 24 चेंडूत 44 धावांची खेळी केली.
स्मृती मंधाना, शेफाली वर्मापाठोपाठ यास्तिका भाटियाही तंबूत , भारताला तिसरा धक्का बसला आहे. 5.3 षटकानंतर भारत तीन बाद 51 धावा
173 धावांचा पाठलाग करताना भारताला सुरवातीला दोन धक्के बसले आहेत. सलामी फलंदाज स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा तंबूत परतले आहेत.
बेथ मूनीचं दमदार अर्धशतक आणि कर्णधार मेग लॅनिंग हिची विस्फोटक खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 172 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताला विजयासाठी ऑस्ट्रेलियाने 173 धावांचे आव्हान दिलेय. निर्णायाक सामन्यात भारताच्या एकाही गोलंदाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही, त्याशिवाय फिल्डर्सनेही नांगी टाकली. फायनलमध्ये पोहचण्यासाठी भाराताला निर्धारित 20 षटकात 173 धावांचे आव्हान आहे.
ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, मोक्याच्या क्षणी शिखानं ग्रेस हॅरिसला केले बाद
फक्त 18 चेंडूत 31 धावा करुन एशलेग गार्डनर बाद झाली.
14.1 षटकात ऑस्ट्रेलियाने 100 धावांचा टप्पा पार केला. दोन विकेट्सच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियानं शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाची कर्णधार सध्या मैदानावर आहे.
अर्थशतकानंतर बेथ मूनी बाद झाली आहे. शिखा पांडेने बेथ मूनीला तंबूचा रस्ता दाखवला. बेथ मूनी हिने जिवदानाचा फायदा घेत अर्थशतक झळकावलं.
सलामी फलंदाज हीली बाद झाल्यानंतर बेथ मूनी हिने सामन्याची सुत्रे घेतली. बेथ मूनी हिने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बेथ मूनी हिने दमदार अर्थशतक झळकावलं.
हीली बाद झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या फलंजांनी दमदार फलंदाजी केली. धावांचा पाऊस पाडला. 11 षटकानंतर ऑस्ट्रेलियाने 70 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत.
भारतीय फिल्डरने खराब फिल्डिंग केली. ऋचा घोष आणि शेफाली वर्मा यांनी झेल सोडले. याचा फटका टीम इंडियाला बसू शकतो.
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, एलेसा हीली हिला राधा यादव हिने बाद केले. ऑस्ट्रेलिया एक बाद 52 धावा
ऑस्ट्रेलियाची सलामी फलंदाज एलेसा हीली आणि बेथ मूनी यांनी दमदार सुरुवात केली आहे. पाच षटकात त्यांनी 32 धावांची भागिदारी केली.
एलेसा हीली आणि बेथ मूनी मैदानावर आले आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एलेसा हीली आणि बेथ मूनी यांनी दमदार सुरुवात केली आहे.
एलिसा हिली (विकेटकीपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), एशलेग गार्डनर, एलिसे पेरी, ताहलिया मॅकग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेयरहम, जेस जोनासेन, मेगन शुट्ट, डार्सी ब्राउन
भारत महिला (प्लेइंग इलेवन) : शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव, रेणुका ठाकुर सिंह
ऑस्ट्रेलियानं नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
भारतीय महिला टीम – स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, रेनुका सिंह.
ऑस्ट्रेलिया महिला टीम – बेथ मूनी (विकेटकीपर), एलिस पेरी, मेग लेनिंग (कर्णधार), एश्ले गार्डनर, ताहलिया मैक्ग्रा, ग्रेस हैरिस, जॉर्जिया वेयरहेम, एनाबेल सदरलैंड, अलाना किंग, मेगन शूट, डार्सी ब्राउन.
थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे. सहा वाजता नाणेफेक होईल.
IND vs AUS, WT20 Live Score : महिला टी20 वर्ल्ड कपमधील पहिला उपांत्य सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर आतापर्यंत वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण, दुसऱ्या डावात फलंदाजीला खेळपट्टी मदत करेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा टी-20 रेकॉर्ड पाहिला, तर भारतीय संघाची बाजू कमकुवत असल्याचं दिसतंय. दोन्ही संघांमधील मागील पाच सामन्यांमध्ये केवळ कांगारू संघानं 4 वेळा विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन सामने गमावले आहेत. अशा स्थितीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील खेळणारा भारतीय संघ यावेळीही काहीसा दडपणाखाली दिसतोय.
एकूण टी-20 रेकॉर्ड पाहिल्यास भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खूपच कमकुवत दिसत आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने केवळ 6 सामने जिंकले आहेत. तर 22 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, एक सामना बरोबरीत राहिला, तर एक सामना अनिर्णीत राहिलाय.
Women's T20 World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामधील हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर (Newlands Cricket Ground, Cape Town.) होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सामना सुरू होईल. सहा वाजता नाणेफेक होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. डिस्ने + हॉटस्टार अॅपवरही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. त्याशिवाय एबीपी न्यूजवर तुम्ही अपडेट पाहू शकता.
पार्श्वभूमी
Women's T20 World Cup Semi Final Live : महिला टी 20 विश्वचषक अंतिम टप्यात पोहचला आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना आज रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अंतिम फेरीत पोहचण्यासाठी लढत होणार आहे. पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता त्यांच्यापुढे ऑस्ट्रेलियाचं तगडे आव्हान असेल. सेमीफायनलचा सामना जिंकणं तसं पाहायला गेलं तर भारतीय संघासाठी फारसं सोपं नसणार आहे. कारण भारतीय महिला संघाचा कांगारू संघाविरुद्ध टी-20मधील रेकॉर्ड फारसा चांगला नाही. जर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेले शेवटचे पाच सामने पाहिले तर त्यातही भारतीय संघ मागे पडल्याचं दिसतंय.
टीम इंडियाला मोठा धक्का, उपांत्य सामन्यापूर्वी पूजा वस्त्राकर आजारी
टी 20 विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्याला काही तास शिल्लक असतानाच भारतासाठी एक चिंताजनक बातमी आली आहे. भारताची आघाडीची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकर आजारी आहे. त्यामुळे ती उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. पूजा वस्त्राकर हिच्या जागी प्लेईंग 11 मध्ये स्नेह राणा हिला संधी देण्यात येणार असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केलेय. सुत्रांच्या माहितीनुसार, कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या खेळण्यावरही सस्पेन्स आहे. हरमनप्रीत कौरही आजारी आहे, त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार असल्याचे काही प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे. हा भारतासाठी मोठा धक्का असू शकतो. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यापूर्वीच पूजा वस्त्राकर हिला व्हायरल इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे ती उपांत्य सामन्याला मुकणार आहे. पूजाच्या जागी स्नेह राणा हिला संघात स्थान देण्यात आले आहे.
पिच रिपोर्ट
महिला टी20 वर्ल्ड कपमधील पहिला उपांत्य सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर आतापर्यंत वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण, दुसऱ्या डावात फलंदाजीला खेळपट्टी मदत करेल.
हेड टू हेड -
हरमनप्रीतच्या टीम इंडियासमोर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं तगडे आव्हान असेल. याआधीचा रेकॉर्ड पाहिल्यास ऑस्ट्रेलियाच्या संघाचे पारडे जड दिसतेय. दोन्ही संघ आतापर्यंत टी 20 मध्ये 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियानं तब्बल 22 वेळा विजय मिळवला आहे. तर भारताला सात सामन्यात विजय मिळवता आला आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -