India vs Bangladesh, T20 Record : भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) या दोन संघात आज टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 35 वा सामना रंगणार आहे. याआधी भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड संघाला मात दिली असून बांग्लादेशनेही दोन विजय मिळवले आहेत. दोघांना प्रत्येकी एक सामना गमवावाही लागला आहे. ज्यानंतर दोघेही आपला सुपर 12 मधील चौथा सामना आज खेळणार आहेत. सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी दोन्ही संघाना आजचा सामना महत्त्वाचा आहे. कारण आज जिंकणारा संघच सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकणार असून दुसऱ्या संघाचा प्रवास अत्यंत खडतर होईल...तर या सामन्यापूर्वी दोघांचा वनडे मधील रेकॉर्ड कसा आहे पाहूया...
भारत आणि बांग्लादेश यांच्यात आजवर तब्बल 11 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये भारताचं पारडं कमालीचं जड आहे. टीम इंडियाने तब्बल 10 सामने जिंकले फक्त एकच सामना बांग्लादेशने जिंकला आहे. त्यानंतर आज दोन्ही संघामध्ये 12 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे.
कसे आहेत टी20 विश्वचषक 2022 साठी दोन्ही संघ?
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह
राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर
बांग्लादेशचा संघ
शाकिब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन, अफिफ हुसैन, इबादोत हुसेन, हसन महमूद, लिटन दास, मेहिदी हसन मिराझ, मुस्तफिजुर रहमान, नजमुल हुसेन शांतो, शॉरीफुल इस्लाम, सौम्या सरकार, मुसद्देक हुसेन, नसुम अहमद, तस्किन अली अहमद, यासी. चौधरी
राखीव खेळाडू : महेदी हसन, रिशाद हुसैन, सब्बीर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन
अशी असू शकते भारताची अंतिम 11
सलामीवीर - रोहित शर्मा, केएल राहुल
मिडिल ऑर्डर फलंदाज - विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत
ऑलराउंडर- हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन आश्विन
गोलंदाज - अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
हे देखील वाचा-