ENG vs NZ, T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेतील सामने अगदी रंगतदार होताना दिसत आहे. प्रत्येत संघ आपल्या खेळाने क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. पण आज झालेल्या ग्रुप 1 मधील न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (NZ vs ENG) सामन्यात एका प्रेक्षकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारण इंग्लंड-न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघात सामना सुरु असताना एकजण चक्क प्रेक्षकांत बसून पुस्तक वाचत होता. 


सामन्यादरम्यान, दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. आयसीसीने हा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक प्रेक्षक अमेरिकन कादंबरीकार क्लाइव्ह कास्लर यांची 'क्रिसेंट डॉन' ही कादंबरी वाचताना दिसत आहे. या पोस्टला मजेशीर कॅप्शन देत आयसीसीनं प्रश्न विचारला आहे की, सामन्यापेक्षा जास्त मनोरंजक आहे का पुस्तक? 


पाहा आयसीसीनं पोस्ट केलेला VIDEO -






याशिवाय आणखी एका चाहत्यानेही सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारण एक चाहता पूर्णपणे बॅटमॅनच्या ड्रेसमध्ये स्टेडियममध्ये बसलेला दिसला. जेव्हा कॅमेरा त्याच्याकडे वळला तेव्हा या बॅटमॅनचं रुप घेतलेल्या फॅनने कॅमेऱ्याकडे पाहून 'मी तुला पाहत आहे' असे हावभाव केले. हा व्हिडीओही आयसीसीनं पोस्ट केला आहे.



इंग्लंड 20 धावांनी विजयी


बऱ्यापैकी चुरशीचा झालेला हा सामना इंग्लंडने 20 धावांनी जिंकला. सामन्यात आधी फलंदाजी करत इंग्लंडने 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. ज्यानंतर 180 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सामन्यात काही काळ चांगली खेळी दाखवली ते जिंकतील अशा आशाही निर्माण झाल्या होत्या. पण अखेर इंग्लंज गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत 159 धावांत न्यूझीलंडला रोखलं आणि 20 धावांनी सामना जिंकला.


हे देखील वाचा-