Pakistan vs England, T20 WC Final : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) हा यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेतील फायनलचा सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जात असून पाकिस्तान संघाची फलंदाजी नुकतीच पार पडली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवत अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं आहे. यावेळी सॅम करन आणि आदिल राशीद यांनी अतिशय अप्रतिम गोलंदाजी केल्याचं दिसून आलं, पाकिस्तानकडून शान मसूनदने 38 आणि बाबर आझमने 32 सर्वाधिक धावा केल्या. आता 138 धावा करुन इंग्लंड विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत. 






सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सेमीफायनलमध्ये भारताला ज्याप्रमाणे कमी धावांत रोखत नंतर निर्धारीत लक्ष्य इंग्लंडनं पूर्ण केलं, तसाच डाव आजही इंग्लंडचा होता. जो त्यांच्या गोलंदाजांनी अगदी योग्यप्रकारे अमलात आणला आणि अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आणि रिझवान यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण 15 धावा करुन रिझवान बाद झाला. मग मोहम्मद हॅरीसही 8 धावांवर बाद झाला.


कर्णधार बाबर चांगली फलंदाजी करत होता, पण 32 धावा करुन तोही तंबूत परतला. इतरही फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण शान मसूदने फटकेबाजी करत 28 चेंडूत 38 धावा ठोकत पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या.  इतर फलंदाज खास कामगिरी करु न शकल्याने 137 धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. इंग्लंडकडून सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पण अष्टपैलू सॅम करनने 4 ओव्हरमध्ये केवळ 12 धावा देत 3 महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. ख्रिस जॉर्डन आणि आदिल राशीद यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. बेन स्टोक्सनेही एक विकेट घेतल्याचं दिसून आलं.


हे देखील वाचा-