T20 World Cup Final 2022: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा आतापर्यंत थरारक ठरली. या स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील अनेक सामने रोमहर्षक ठरले. भारत (India), पाकिस्तान (Pakistan), न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) हे चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामना आतापर्यंतचा सर्वात थरारक सामना ठरला. यानंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा फायनलमध्ये आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे. यादरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटू शेन वॉटसननं  (Shane Watson) भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषकातील फायनल सामना पाहण्यासाठी सर्वांनाच आवडेल.


ट्वीट-






 


भारत-पाकिस्तान पाहण्यासाठी लोक उस्तूक
टी-20 विश्वचषकाच्या फायनलसंदर्भात शेन वॉटसन म्हणाला की, "मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पाहायला सर्वांनाच आवडेल." ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत वॉटसनला आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पाहण्याची उस्तूकता लागलीय. यापूर्वी 2007 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. त्यावेळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं पाकिस्तानला हरवत विजेतेपद पटकावलं. दरम्यान, 15 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.


भारत-पाकिस्तान फायनलमध्ये सामने येण्याची शक्यता
 ग्रुप 2 मधून भारत आणि पााकिस्तान हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये गेले आहेत. भारतानं पाच पैकी चार सामने जिंकून एकूण 8 गुणांसह दिमाखात सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका अखेरच्या सामन्यात नेदरलँडकडून पराभूत झाल्यानं पाकिस्तान बांग्लादेशला मात देत सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आता भारत इंग्लंडसोबत आणि पाकिस्तान न्यूझीलंडसोबत सेमीफायनल खेळेल आणि दोघे संघ आपआपले सामने जिंकून फायनलमध्ये आमने-सामने येऊ शकतात.


यजमान ऑस्ट्रेलियाच्या पदरात निराशा
2021 मध्ये ऑस्ट्रेलियानं टी-20 विश्वचषकाचा खिताब जिंकलाय. मात्र, यंदाच्या टी-20 विश्वचषकात आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला सुपर 12 फेरीतच आपलं सामान गुंडळावं लागलंय. 


हे देखील वाचा-


T20 world Cup 2022: सूर्यासमोर 20वं षटक टाकताना गोलंदाज जोडतात हात; अवघ्या 18 चेंडूत ठोकल्यात 'इतक्या' धावा