T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12 चा पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (New Zealand vs Australia) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, न्यूझीलंडकडून सलामी देण्यासाठी मैदानात आलेल्या डेवॉन कॉन्वेनं (Devon Conway) नाबाद 92 धावांची वादळी खेळी. या कामगिरीसह त्यानं भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) मोडलाय. तसेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) विक्रमाशी बरोबरी केलीय.  विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 27 डावात 1000 धावांचा टप्पा गाठलाय. त्यानंतर बाबर आझमनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या 26 डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत डेवॉन कॉन्वेचाही समावेश झालाय. त्यानंही 26 डावात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 1000 धावांचा टप्पा पूर्ण केल्या. 

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत इंग्लंडचा डेव्हिड मलान अव्वल स्थानी आहे. त्यानं अवघ्या 24 डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.  या यादीत डेवॉन कॉन्वे आणि बाबर आझम संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर विराट तिसऱ्या (27 डाव), आरोन फिंच चौथ्या (29  डाव) आणि केएल राहुल पाचव्या (29 डाव) स्थानावर आहे. 

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज:

फलंदाज डाव
डेविड मलान 24
डेवॉन कॉन्वे 26*
बाबर आझम 26
विराट कोहली 27
आरोन फिंच 29
केएल राहुल 29

 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेवॉन कॉन्वेची धमाकेदार फलंदाजी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात डेव्हन कॉन्वेनं 92 धावांची नाबाद खेळी खेळली. यासह त्याच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 1033 धावा झाल्या आहेत. त्यानं या सामन्यात 57.39 च्या सरासरीने आणि 136.10 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केलीय.

हे देखील वाचा-