T20 World Cup 2022: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (New Zealand vs Australia) यांच्यात टी-20 विश्वचषकातील सुपर-12 फेरीतील पहिला सामना खेळला जातोय. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) खेळला जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडनं (Josh Hazlewood) नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यात जोश हेडलवूडनं न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अॅलेन आणि ग्लेन फिलिप्सला माघारी धाडून 2021 पासून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज ठरलाय. यापूर्वी या यादीत भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar kumar) अव्वल स्थानी होता.

दरम्यान, 2021 पासून पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत जोश हेजलवूड 24 विकेट्ससह अव्वल स्थानी पोहचलाय. या यादीत भुवनेश्वर कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 23 विकेट्सची नोंद आहे. यानंतर नसुम अहमद तिसऱ्या (19 विकेट्स) आणि मार्क अडायर (17 विकेट्स) चौथ्या क्रमांकावर आहे. 

2021 पासून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स

क्रमांक गोलंदाज विकेट्स
1 जोश हेजलवुड 24
2 भुवनेश्वर कुमार 23
3 नसुम अहमद 19
4 मार्क अडायर 17

 

संघ-

न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन:
डेव्हॉन कॉन्वे (विकेटकिपर), फिन ऍलन, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन:
आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

हे देखील वाचा-