Team India in T20 World Cup :भारतीय संघ (Team India) टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सामन्यांसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. सराव सामनेही झाले असून आता थेट 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) महामुकाबल्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. दरम्यान भारत असणाऱ्या ग्रुपमध्ये आता झिम्बाब्वे आणि नेदरलँड या संघानी जागा मिळवली आहे. ज्यानंतर भारताचे विश्वचषकातील सामन्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. तर नेमका भारताचा सामना कधी कोणासोबत आहे पाहूया... 

सामनादिवसवेळ
भारत विरुद्ध पाकिस्तान23 ऑक्टोबरदुपारी 1.30 वाजता
भारत विरुद्ध नेदरलँड27 ऑक्टोबरदुपारी 12.30 वाजता
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका30 ऑक्टोबरदुपारी 4.30 वाजता
भारत विरुद्ध बांग्लादेश2 नोव्हेंबरदुपारी 1.30 वाजता
भारत विरुद्ध झिम्बाब्वे6 नोव्हेंबरदुपारी 1.30 वाजता

विश्वचषक संघात बुमराहच्या जागी शमीची एन्ट्री

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्वचषक अगदी तोंडावर असताना दुखापत झाली. त्यामुळे भारतात बुमराहच्या जागी कोण खेळणार? हा प्रश्न सर्वांसमोर होता. ज्यानंतर नुकतीच टीम इंडियाने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची बुमराहच्या जागी संघात एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता बुमराहच्या जागी शमी आल्यानंतर T20 विश्वचषकासाठी भारताचे अंतिम 15 खेळाडूंची यादी समोर आली आहे.

असा आहे भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर 

हे देखील वाचा-

IND vs PAK, Weather Report : भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याचा उत्साह शिगेला, पण पाऊस व्यत्यय आणणार? कशी असेल हवामानाची स्थिती?