ICC T20 World Cup : आयसीसी टी20 विश्वचषकाचा (ICC T20 World Cup 2022) थरार आता हळूहळू जवळ येत आहे. ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या या महास्पर्धेसाठी आता 100 दिवस शिल्लक असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) याबाबत एक खास ट्वीट करत क्रिकेटप्रेमींची उत्सुकता आणखी वाढवली आहे. यावेळी आयसीसीने एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये विश्वचषकाशी संबधित सर्व संघातील एक-एक आघाडीचा खेळाडू दिसून येत आहे. यामध्ये भारताकडून विराट कोहली दिसत असून मध्यभागी यजमान संघाचा ग्लेन मॅक्सवेल दिसत आहे.

यंदा विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघ आधीच पात्र ठरले आहेत तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ 16 ऑक्टोबरपासून पात्रता फेरीचे सामने खेळतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. 

कसे असतील ग्रुप?

ग्रुप-1: इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि अन्य दोन क्वालिफायर ग्रुप-2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अन्य दोन क्वालिफायर 

भारताचा सामना कधी? कोणाशी?

  • भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर (मेलबर्न)
  • भारत विरुद्ध ग्रुप ए रनर-अप, 27 ऑक्टोबर (सिडनी)
  • भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका, 30 ऑक्टोबर (पर्थ)
  • भारत विरुद्ध बांग्लादेश, 2 नोव्हेंबर (एडिलेड)
  • भारत विरुद्ध ग्रुप बी विजेता, 6 नोव्हेंबर  (मेलबर्न)

हे देखील वाचा-