मुंबई: जर्मनीचा महान फुटबॉलपटू मिरोस्लाव्ह क्लोसानं फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 38 वर्षांच्या मिरोस्लाव्ह क्लोसाच्या खात्यात फिफा विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल जमा आहेत.

क्लोसानं जर्मनीकडून 137 सामन्यांत सर्वाधिक 71 गोल झळकावण्याचा विक्रमही नोंदवला आहे. 2014 साली ब्राझिलमध्ये झालेल्या विश्वचषकात क्लोसानं दोन गोल डागले होते.

क्लोसानं व्यावसायिक फुटबॉलमध्ये बायर्न म्युनिक आणि लॅझियो या दोन संघांचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. व्यावसायिक फुटबॉलमध्ये क्लोसाच्या नावावर 598 सामन्यांत 232 गोल जमा आहेत.

दरम्यान, खेळाडू म्हणून निवृत्त झालेला मिरोस्लाव्ह क्लोसा आता जर्मनीच्या कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होणार असल्याचं वृत्त आहे.