World Cup Player of The Tournament :  2023 च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाची सांघिक कामगिरीसह वैयक्तिक कामगिरीने सुद्धा भरलेली आहे. रोहित शर्मा नाही तर विराट कोहली होता, दोघेही नसतील तर केएल राहुल किंवा श्रेयस अय्यर होता आणि जर ते फलंदाज नसतील तर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीने भारताला स्पर्धेत अपराजित राहण्यास मदत केली. त्यामुळे टीम इंडियाचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार योग्यरित्या भारतीय खेळाडूला दिला गेला पाहिजे, असे म्हटले आहे. दरम्यान, वर्ल्डकपचा मानकरी होण्यासाठी टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह शर्यतीत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून झम्पा आणि मॅक्सवेल शर्यतीत आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून डिकाॅक आणि न्यूझीलंड डॅरेल मिशेल आणि रचिन रविंद्र शर्यतीत आहेत. 






अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या विश्वचषक अंतिम सामन्याच्या आधी इंडिया टुडेशी बोलताना गावस्कर यांनी प्रतिष्ठित पुरस्कारासाठी कोहलीची निवड केली. कारण 1983 च्या विजेत्या टीममधील गावसकर यांनी स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले. कोहलीने 10 सामन्यांमध्ये 8 वेळा 50हून अधिकवेळा धावा करताना विक्रमी 711 धावा केल्या, ज्यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रमही वर्ल्डकपमध्ये पार केला. 






गावसकर काय म्हणाले? 


“मला दोन निवडायचे आहेत आणि दोघेही भारतीय आहेत. कोहली, संपूर्ण स्पर्धेत त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली, 50 शतकांचा विक्रम केला. यापूर्वी कोणीही असा पराक्रम केला नाही, असे ते म्हणाले. तसेच कॅप्टन रोहितला केवळ त्याच्या आक्रमक आणि नि:स्वार्थी फलंदाजीसाठी दुसरा पर्याय म्हणून निवडले. ज्याने भारताला सुरुवातीच्या काळात योग्य गती निश्चित करण्यात मदत केली, परंतु संपूर्ण स्पर्धेत त्याच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी देखील.






गावसकर यांनी सांगितले की, “रोहित शर्मा, ज्या प्रकारे नंतर येणाऱ्या फलंदाजांसाठी मार्ग मोकळा केला आहे, इतक्या निःस्वार्थपणे फलंदाजी करत भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली, ज्यामुळे विरोधी गोलंदाजांवर दबाव निर्माण होतो. अगदी कठीण परिस्थितीतही, त्याने एक शांतता दर्शविली आहे जी खरोखरच उर्वरित संघाला भिडली आहे. त्याच्या संघाला प्रेरित करण्याची ही उत्तम क्षमता आहे. आणि संघाबद्दल एक शांतता आहे; संघाबद्दल एकतेची भावना आहे, जी पाहणे खूप छान आहे,” गावस्कर पुढे म्हणाले.






गावसकर यांनी मात्र गोलंदाजीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या शमीला त्यांनी निवडले नाही. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर विश्वचषकातील भारताच्या पाचव्या सामन्यात बेंचवर उतरताना शमीने सहा सामन्यांमध्ये 23 विकेट्स घेतल्या ज्यात तीन पाच बळी घेतले. न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याचा सर्वात उल्लेखनीय खेळ होता, जिथे त्याने केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल यांच्यातील धोक्याची शतकी भागीदारी मोडली.


इतर महत्वाच्या बातम्या