World Cup 2019 Team Squad मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2019 साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात 15 सदस्यीय टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. बॅकअप विकेटकीपरच्या शर्यतीत दिनेश कार्तिकने रिषभ पंतला मागे टाकत संघात जागा मिळवली आहे. रिषभ पंतची 15 सदस्यी टीम इंडियामध्ये निवड झालेली नाही.

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय निवड समितीने आज मुंबईतील पत्रकार परिषदेत विश्वचषकासाठी भारताच्या संघाची घोषणा केली. आयसीसीने खेळाडूंची निवड करण्यासाठी सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डांना 23 एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती.

भारताकडे काय आहे?



  • जगातील सर्वोत्कृष्ट तीन क्रिकेटपटू

  • जगातील सर्वोत्कृष्ट जलदगती गोलंदाज

  • दोन उत्कृष्ट जलदगती गोलंदाज

  • जगातील दोन उत्तम फिरकीपटू

  • अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज


VIDEO | विश्वचषक सामन्यावर बहिष्कार घालून पाकला विजयाचे आयते गुण का द्यायचे? : सचिन तेंडुलकर


भारताकडे काय नाही?



  • मधळ्या फळीतला डावखुरा फलंदाज

  • डावखुला जलदगती गोलंदाज

  • प्रस्थापित मधली फळी

  • दहा षटकं टाकू शकेल असा अष्टपैलू जो दोन प्रमुख गोलंदाजांना साथ देईल


 

विश्वचषकासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी