लंडन : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरीच्या बळावर सेमीफायनलमध्ये धडक मारलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला खेळाडूंच्या दुखापतीचा चांगलाच फटका बसला आहे. सेमीफायनलच्या आधी फार्मात असलेले दोन खेळाडू संघाबाहेर जात असल्याचे संघाला मोठा धक्का बसला आहे.
संघाचा तडाखेबाज फलंदाज उस्मान ख्वाजा दुखापतीमुळे संघाच्या बाहेर गेला आहे तर अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस देखील जायबंदीझाला आहे. त्याचे इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळणे अनिश्चित मानले जात आहे.
दरम्यान या दोन खेळाडूंच्या जागी मॅथ्यू वेड आणि मिशेल मार्श यांना संघात समाविष्ट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितले की, ख्वाजा विश्वचषकातून बाहेर झाला आहे, त्याच्या जागी टीममध्ये मॅथ्यू वेडला समाविष्ट करण्यात आले आहे.
शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात उस्मान ख्वाजा दुखापतग्रस्त झाला होता. तर स्टॉयनिस दुखापतीमुळे आधीच्या दोन सामन्यात खेळू शकलेला नाही.
दरम्यान, इंग्लंडमधल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे तर दुसरा उपांत्य सामना 11 जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येईल. या सामन्यात यजमान इंग्लंडचा मुकाबला त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
सात सामन्यातील विजय (14 गुण) आणि एका रद्द सामन्यामधून मिळालेला 1 गुण मिळून 15 गुणांसह भारताने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. तर 5 विजयांसह न्यूझीलंडच्या संघाने 11 गुण मिळवले आहेत. न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.
दरम्यान नऊ सामन्यांपैकी सात विजयांसह ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडच्या संघाने सहा विजयांसह 12 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणार आहे.
World Cup 2019 । सेमीफायनलच्या आधी ऑस्ट्रेलियाला झटका, दोन महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2019 09:54 AM (IST)
दरम्यान या दोन खेळाडूंच्या जागी मॅथ्यू वेड आणि मिशेल मार्श यांना संघात समाविष्ट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितले की, ख्वाजा विश्वचषकातून बाहेर झाला आहे, त्याच्या जागी टीममध्ये मॅथ्यू वेडला समाविष्ट करण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -