WWC17 Final : इंग्लंडला सहावा धक्का, नताली स्किवर बाद

लंडन : लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरूद्ध इग्लंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आनंदाची बाब म्हणजे खांद्याला दुखापत झाल्यानंतरही हरमनप्रीत कौर या सामन्यात खेळणार आहे.

सेमी फायनलमध्ये सहा वेळा विजेता राहिलेल्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतीय महिला संघाने फायनलमध्ये धडक मारली. यात 171 धावांची विक्रमी खेळी करुन हरमनप्रीतने भारताच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली होती.

दुसरीकडे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचा इशारा कर्णधार मिताली राजने अंतिम सामन्यापूर्वी दिला आहे. भारताने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे आज होणाऱ्या भारत विरूद्ध इंग्लंडच्या सामन्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर

विश्वचषकातील कठीण मेहनतीचं चांगलं फळ मिळवण्यासाठी मिताली राजची टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास भारतीय महिला संघाची विश्वचषक जिंकण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी भारतीय महिला संघाने 2005 साली फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली.

मिताली राजच्या टीम इंडियाचा विजय हा भारतीय क्रिकेटची समीकरणं बदलणारा ठरु शकतो. भारतीय पुरुष संघानेही 1983 साली लॉर्ड्सच्या मैदानात वेस्ट इंडिजला हरवून पहिल्यांदाच विश्वचषक नावावर केला होता.

भारताने अंतिम सामना जिंकल्यास महिला विश्वचषक जिंकणारा भारतीय संघा हा चौथा संघ असेल. महिला विश्वचषकात आतापर्यंत इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानेच सर्व विश्वचषक जिंकलेले आहेत.

LIVE UPDATE

#IndvsEng महिला विश्वचषक फायनल, इंग्लंडला पहिला धक्का, विनफिल्ड 24 धावांवर बाद

#WWC17 Final : इंग्लंडला लागेपाठ दुसरा धक्का, टॅमी ब्यूमाँट 23 धावांवर बाद

Final : इंग्लंडला तिसरा धक्का, कर्णधार हिदर नाईट एका धाव करुन बाद, पूनम यादवला सलग दुसरी विकेट