लंडन : प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आफ्रिकेच्या केविन अँडरसनला 6-2, 6-2, 7-6 (7-3) असं पराभूत केलं. एकतर्फी विजय मिळवत जोकोविचने कारकीर्दीतील तेरावं ग्रँडस्लॅम, तर या स्पर्धेचं चौथं विजेतेपद पटकावलं.
जोकोविचने सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड मजबूत केली होती. पहिले तीन गेम जोकोव्हिचने जिंकले. त्यानंतर अँडरसनचा पुनरागमन करण्याचा प्रयत्न जोकोविचने यशस्वी होऊ दिला नाही.
पहिला गेम जोकोविचने 6-2 असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटची सुरुवातही जोकोविचच्या विजयानेच झाली. तो 4-1 असा आघाडीवर असताना अँडरसनने पुन्हा एकदा पुनरागमन करत दुसरा गेम जिंकला. पण त्यापुढील गेम आपल्या नवे करत जोकोविचने दुसरा सेट खिशात घातला. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये जोकोविचने अँडरसनला टायब्रेकरमध्ये पराभूत केलं आणि सामना नावावर केला.
सेमी फायनलमधील जोकोविच आणि नदाल यांच्यातील सामना अत्यंत रंगतदार झाला. या दोघांनी सामन्यात टेनिसरसिकांना तब्बल सव्वा पाच तास खिळवून ठेवलं. जोकोविचने द्वितीय मानांकित राफेल नदालचा संघर्ष 6-4, 3-6, 7-6, 3-6, 10-8 असा पाच सेट्समध्ये मोडून काढला.
विम्बल्डन स्पर्धेत जोकोविचचा विजय, कारकीर्दीतलं तेरावं ग्रँडस्लॅम नावावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jul 2018 10:52 PM (IST)
एकतर्फी विजय मिळवत जोकोविचने कारकीर्दीतील तेरावं ग्रँडस्लॅम, तर या स्पर्धेचं चौथं विजेतेपद पटकावलं. जोकोविचने सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड मजबूत केली होती.
फोटो : ट्विटर
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -