बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ आज दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरल्याचे आपण पाहिले. बँगलोरचा संघ 2011 पासून दरवर्षी आयपीएलच्या एका सामन्यात पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंगबाबतच्या जनजागृतीसाठी हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरतो. यावर्षीही बँगलोरने ती परंपरा कायम ठेवली आहे. नाणेफेकीवेळी विराट कोहलीने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला एक झाड भेट म्हणून दिले.


आज संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग या मोठ्या समस्येला सामोरे जात आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे. परंतु आपण अगदी त्याउलट वागत आहोत. जगभर विकासकामांच्या नावाखाली वृक्षतोड सुरु आहे. ही वृक्षतोड थांबवून झाडे लावा असा संदेश देण्यासाठी अनेक संस्था, संघटना आणि लोक जनजागृती करत असतात. जनजागृतीसाठी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघदेखील दरवर्षी आयपीएलमध्ये एक सामना हिरव्या रंगाची जर्सी घालून खेळतो. यंदादेखील विराटने ती परंपरा जपली आहे.

वाचा : IPL 2019 : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पराभवाचा षटकार, दिल्लीचा तिसरा विजय