T20 World Cup 2022 Match Live Streaming : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धा सुरु झाली असून सध्या सुपर 12 मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी क्वॉलीफायर सामने सुरु आहेत. आज स्पर्धेत दोन सामने पार पडजाणार असून पहिला सामना श्रीलंका विरुद्ध नेदरलँड (SL vs NED) आणि दुसरा सामना नामिबिया विरुद्ध युएई (NAM vs UAE) यांच्यात खेळवला जाईल. विशेष म्हणजे नेदरलँडनो दोन विजय मिळवल्याने ते सुपर 12 मध्ये जवळपास पोहोचले असून युएईने दोन सामने गमावल्यामुळे ते स्पर्धेबाहेर गेले आहेत. तर आज नामिबिया आणि श्रीलंका संघाला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवावा लागेल, यातील एक संघही पराभूत झाल्यास नेदरलँडसह दुसरा विजयी संघ हा सुपर 12 मध्ये जाईल. जर दोघेही विजयी झाले तर नेट रनरेटने निर्णय होईल, त्यामुळे आजचे सामने निर्णयाक असणार आहेत. तर आज पार पडणाऱ्या या सामन्यांबद्दलची माहिती जाणून घेऊ...
कोणा-कोणाचे आहेत सामने?
आज दोन सामने खेळवले जाणार असून पहिला सामना श्रीलंका विरुद्ध नेदरलँड आणि दुसरा सामना नामिबिया विरुद्ध युएई असा रंगणार आहे.
कधी होणार सामने?
भारतीय वेळेनुसार दिवसातील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध नेदरलँड सकाळी 9.30 वाजता त्यानंतरतर दुसरा नामिबिया विरुद्ध युएई सामना दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल.
कुठे आहेत सामने?
आजचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाच्या जिलाँग येथील सायमंड या क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
वेस्ट इंडीजसह आयर्लंडचा विजय
19 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या दोन सामन्यात वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेला तर आयर्लंडने स्कॉटलंडला मात दिली. यावेळी पहिल्या सामन्यात आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू कर्टीस कॅम्फरनं स्कॉटलंडविरुद्ध अष्टपैलू खेळी करत 2 विकेट्स आणि 72 धावा केल्या, ज्यामुळे सामना आयर्लंडने 6 विकेट्सनी जिंकला. सामन्यात आधी फलंदाजी करत स्कॉटलंडनं 176 धावा केल्या, ज्यांचा पाठलाग करताना आयर्लंडनं 19 ओव्हरमध्ये सामना जिंकला. त्यानंतर दुसरा सामना जो वेस्ट इंडीजसाठी करो या मरोचा होता त्यामध्ये वेस्ट इंडीजनं 31 धावांनी विजय मिळवला. ज्यामुळे सुपर 12 मध्ये त्यांच्या एन्ट्रीच्या आशा अजूनही जिवंत आहेत. कारण स्पर्धेतील पहिल्या सामन्यात स्कॉटलंडने त्यांना मात दिली होती, ज्यामुळे आजचा सामना त्यांनी गमावला असता तर त्याचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असतं. पण या करो या मरोच्या सामन्यात वेस्ट इंडीजने विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. सामन्यात वेस्ट इंडीजने 153 रन केले ज्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 122 धावांमध्ये सर्वबाद झाला आणि वेस्ट इंडीजने 31 धावांनी सामना जिंकला.
हे देखील वाचा-