FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA WC 2022) अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. अर्जेंटिना आणि फ्रान्समधील हा सामना फारच रोमांचक ठरला. या सामन्यामध्ये अर्जेंटिना संघाचा कर्णधार आणि स्टार फूटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि अर्जेंटिना संघ खूप उत्साहात खेळताना पाहायला मिळाला. सामन्याच्या सुरुवातीपासून अर्जेंटिना संघ फ्रान्सच्या संघावर वरचढ ठरताना दिसला. सेकेंड हाफमध्ये फ्रान्सच्या एम्बाप्पेने सामना पूर्णपणे बदलला. मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनानं फ्रान्सवर 4-2 (France vs Argentina) असा विजय मिळवला.


सोशल मीडिया, व्हॉट्सॲप स्टेटस सर्वत्र अर्जेंटिना आणि लिओनेल मेस्सीची जोरदार चर्चा आहे. यासोबतच लोक अर्जेंटिनाच्या संघाची एनर्जी आणि खेळाचे खूप कौतुक करत आहेत. अर्जेंटिनाच्या या विजयामध्ये खेळांडूचा उत्साह आणि एनर्जीमागे आणखी एक कारण आहे. एक ड्रिंक अर्जेंटिना संघाच्या चांगल्या कामगिरीचे कारण असल्याचे मानले जात आहे. हे ड्रिंक कोणतं आहे आणि याचा अर्जेंटिनाच्या यशामागे याचा संबंध काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.


हे पेय स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्यासह अर्जेंटिना संघातील प्रत्येक खेळाडूची आवडती ड्रिंक आहे. ही ड्रिंक अर्जेंटिनाच्या संघासाठी एवढी खास आहे की, या ड्रिंकचा 5 क्विंटलचा साठा घेऊन अर्जेंटीना संघ कतारला पोहोचला. येथे दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की मेस्सीच्या हातामध्ये एक ड्रिंक आहे. ही ड्रिंक खूप खास आहे.


काय आहे खास ड्रिंक? ( What is Yerba Mate )


या खास पेयाचं (Drink) नाव आहे येरबा माटे. येरबा माटे (Yerba Mate) एक हर्बल ड्रिंक (Harbal Drink) आहे. हे पेय अमेरिकन खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे. हे पेय यरबा माटे नावाच्या वनस्पतीपासून तयार करण्यात येतं. यरबा माटे ही दक्षिण अमेरिकेमध्ये आढळणारी एक विशेष प्रकारची वनस्पती आहे. येरबा माटे (Yerba Mate Drink) एक प्रकारचा चहा आहे. याला एक खास प्रकारचा काढाही म्हणता येईल. 


पाहा फोटो : येरबा माटे पिण्याचं पारंपारिक भांडं 


लौकी नावाच्या पारंपारिक भांड्यामध्ये हे येरबा माटे ड्रिंक पिण्याची पद्धत आहे. यामध्ये एक स्ट्रॉ असते. यरबा माटे नावाच्या वनस्पतीची पाने पाण्यामध्ये उकळवून हे पेय तयार केलं जातं. लौकी नावाच्या भांड्यामध्ये हे ड्रिंक उकळवतात, त्यामध्ये एक जाळीदार स्ट्रॉ असते. त्यामुळे स्ट्रॉमधून पानं गाळून तुम्हाला हे ड्रिंक प्यायला मिळतं.




अर्जेंटीनासोबतच पराग्वे, उरुग्वे, ब्राजीलच्या खेळाडूंमध्येही हे पेय खूप प्रसिद्ध आहे. हे खेळाडू या ड्रिंकचा साठा सोबत ठेवतात. खेळाडू मॅचदरम्यान सरावादरम्यान आणि मॅचनंतरही हे ड्रिंक पिताना दिसतात.