Wrestlers Protest At Jantar Mantar: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI President) अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij bhushan sharan singh) यांच्या विरोधात देशातील कुस्तीपटूंनी आंदोलन उभारलं आहे. दिग्गज कुस्तीपटूंसह या विरोध करणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशातील गोंडा येथील नंदिनी नगर स्टेडियममध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या कुस्तीपटूंचाही समावेश आहे. हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील अनेक खेळाडू येथे झालेल्या स्पर्धेत न खेळताच परतत आहेत. हे सर्व पैलवान भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिल्लीतील जंतरमतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत आहेत. 18 जानेवारीपासून बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशिवाय देशातील अनेक आघाडीच्या कुस्तीपटूंनी संघटनेच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत.


बरेच खेळाडू न खेळताच परतले


समोर येणाऱ्या माहितीनुसार, गोंडा येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेले बरेच खेळाडू न खेळताच परतत आहेत. आम्ही आमच्या इच्छेने खेळत नसल्याचे या खेळाडूंचे म्हणणे आहे. आम्ही दिल्लीत जंतरमंतरवर बसलेल्या आमच्या बंधू-भगिनींच्या समर्थनार्थ न खेळता जात आहोत. जंतरमंतरवर गेल्यावर तिथून घरी परतू, असे या खेळाडूंचे म्हणणे आहे. गोंडाच्या नंदिनी नगरमध्ये शनिवारपासून राष्ट्रीय चॅम्पियनशिप सुरू होत आहे. दरम्यान या खेळाडूंना भेटण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग शुक्रवारी स्टेडियमवर पोहोचले. यादरम्यान भाजप खासदार ब्रिजभूषण म्हणाले होते की, अनेक खेळाडू आमच्यासोबत आहेत. त्याचवेळी त्यांच्या या वक्तव्यानंतर अर्धा डझनहून अधिक खेळाडू न खेळताच परतत आहेत. त्यामुळे युनियनच्या अध्यक्षांना मोठा धक्का बसला आहे. गोंडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील अनेक खेळाडू आले होते.


काय नेमकं प्रकरण?


18 जानेवारी रोजी, देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंपैकी बजरंग पुनिया (Bajrang Puniya) आणि विनेश फोगट (Vinesh Phogat) यांनी जंतर-मंतर येथे भारतीय कुस्ती महासंघ आणि तिचे अध्यक्ष यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जंतर जंतर येथे आंदोलन करताना बजरंग पुनिया म्हणाला की, संघटनेने आपल्या खेळाडूंना गुलामासारखी वागणूक देऊ नये. तर विनेश फोगटने कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.  


हे देखील वाचा-