मुंबई : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. येत्या 21 जुलैपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
अनुभवी यष्टीरक्षक दिनेश रामदीनला वेस्ट इंडिजच्या संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी रोस्टन चेसला पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रिकेट संघात संधी दिली आहे.
याशिवाय सराव सामन्यात शतक ठोकणाऱ्या शाय होपला निवड समितीने संघात स्थान दिलेलं नाही. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सहभागी असलेले मिगुएल कर्मिस आणि जोमेल वॉरिकन यांनाही 12 जणांमध्ये जागा मिळालेली नाही.
वेस्ट इंडिज संघ : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट (उपकर्णधार), देवेंद्र बिशू, जर्मेन ब्लॅकवूड, कार्लोस ब्रेथवेट, डेरेन ब्रावो, राजेंद्र चंद्रिका, रोस्टन चेस, शेन डोव्हरिच (यष्टीरक्षक), शॅनन गॅब्रिएल, लियोन जॉनसन, मार्लन सॅमुअल्स
भारत आणि विंडीजमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असून पहिला सामना एंटिगुआमध्ये होईल.
सामन्यांचं वेळापत्रक
21 ते 25 जुलै : सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राऊंड, एंटीगुआ
30 जुलै ते 3 ऑगस्ट : सबीना पार्क, जमैका
9 ते 13 ऑगस्ट : डॅरन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट ग्राऊंड, सेंट लूसिया
19 ते 22 ऑगस्ट : क्वीन्स पार्क ओवल, त्रिनिदाद अँड टोबॅगो