बेस्टचं 'माईंड द विंडोज: माय स्टोरी' हे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होत आहे. बेस्ट नेहमी वादात का अडकला याबाबत या पुस्तकात अनेक खुलासे होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
बेस्टच्या आत्मचरित्राचा काही अंश 'मेल ऑनलाईन'ने प्रसिद्ध केला आहे.
"मी मुलींवर आणि मुली माझ्यावर प्रेम करतात. त्यामुळे मी जगातील सर्वात सुंदर मुलगा आहे, असं मला वाटतं. मस्करीत मला ब्लॅक ब्रॅड पिट म्हणतात. ज्या ज्या देशात मी क्रिकेट खेळण्यास गेलो, त्या त्या ठिकाणी मी तरुणींशी बोललो, डेटिंगवर गेलो, इतकंच नाही तर त्यांच्यासोबत रात्र घालवली, झोपलो. मी जगभरातील सुमारे 500 ते 650 मुलींसोबत झोपलो आहे" असं बेस्टने त्याच्या आत्मचरित्रात म्हटलं आहे.
बेस्ट पुढे म्हणतो, "माझी पहिली प्रेयसी मेलिसाला माझ्याकडून एक मुलगीही झाली होती. तमानी तीचं नाव. मात्र आमच्या दोघांमध्ये बिनसल्याने आम्ही वेगळं झालो. मी बार्बाडोसकडून खेळताना जेव्हा विकेट घेईल, तेव्हा मेलिसा परत येईल, असं माझे मित्र मला सांगायचे. मात्र तसं झालं नाही. तीने जेव्हा माझ्याशी नातं तोडलं, तेव्हा मी अक्षरश: प्लेबॉय बनलो. स्पष्टच सांगायचं झालं, तर मी 'पुरुष वेश्या'चं झालो.
म्हणून पुस्तकाचं नाव 'माईंड द विंडोज'
टिनो बेस्टच्या पुस्तकाच्या नावाचीही रंजक कहाणी आहे. वेस्ट इंडीज संघ 2004 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर होता, तेव्हा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉपने बेस्टला 'माईंड द विंडोज' असं म्हटलं होतं. खरंतर त्यावेळी बेस्टने अश्ले जाईल्सच्या गोलंदाजीवर स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी तो बाद झाला. फ्लिंटॉपला त्यावेळी हसू आवरलं नव्हतं.
महत्त्वाचं म्हणजे फ्लिंटॉपनेच या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.