बर्मिंगहम: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आहे. आता या सामन्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. पण इंग्लंडमधील हवामान विभागाच्या वेबसाईटनं बर्मिंगहममधील सामन्यात पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडीशी नाराजी आहे.


युके हवामान विभागाची वेबसाईट ‘metoffice.gov.uk‘ च्या मते, सकाळी थोडासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच दुपारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण तरीही इंग्लंडमधील हवामानाचा अचूक अंदाज लावता येऊ शकत नाही. कारण की, कधी-कधी इथं पाऊस फार जोरात येतो आणि काही वेळातच नाहीसाही होतो.

त्यामुळे उद्या सामन्यादरम्यान, नेमकं काय होणार? याचा अंदाज लावणं तसं कठीण आहे.



सामन्यादरम्यान पाऊस आला तर काय होणार?

जर हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला तर दोन संघांसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणं महत्वाचं आहे. जर पाऊस आलाच तर डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला नंतर फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरु शकतो. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकीचा कौल फार महत्वाचा आहे.
जर भारतानं नाणेफेक जिंकली तर प्रथम गोलंदाजी करताना पाकला कमीत कमी धावांमध्ये रोखणं गरजेचं आहे. किंवा भारताला पहिले फलंदाजी करावी लागली तर जास्तीत जास्त धावा करणं आवश्यक आहे. कारण की, पाऊस झाल्यास सामना कोणाच्याही बाजूनं झुकू शकतो.

संबंधित बातम्या:

भारत-पाकिस्तान सामन्याआधी विराटची अनोखी आयडिया