फलंदाजी करताना धोनीचे वेगळे फटके कायमच पाहायला मिळतात. पण आजच्या सामन्यात विकेटकिपिंग करताना धोनीनं अशी काही करामत केली की, न्यूझीलंडचे फलंदाजही अवाक झाले.
रांचीमध्ये सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी 46व्या षटकात रॉस टेलरनं फाइन लेगला फटका मारुन दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी धवल कुलकर्णीनं तेवढ्याच तत्परतेनं धोनीकडे चेंडू फेकला.
खरंतर ज्यावेळी धोनीच्या हातात चेंडू आला. त्यावेळी त्याची स्टंपकडे पाठ होती. मात्र, धोनीनं स्टंपकडे न वळता हातात आलेला चेंडू तसाच स्टंपवर मारला. चेंडू जेव्हा स्टंपवर आदळला. त्यावेळी टेलर क्रिझमध्ये पोहचलाच नव्हता. त्यामुळे धोनीच्या या चालाखीनं टेलरला थेट तंबूत परत जावं लागलं. धोनीच्या या करामतीनं सगळेच हैराण झाले.
धवल कुलकर्णीनं फेकलेला चेंडू हा स्टंपपासून दूर होता. ही गोष्ट धोनीनं वेळीच हेरली आणि स्टंपपासून दूर असूनही त्यानं चेंडू अचूक स्टंपवर मारला आणि टेलरला बाद केलं. बाद झाल्यानंतर पव्हेलियनकडे परत चाललेल्या टेलरला देखील या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता.
VIDEO: