नियमित कामासाठी मंत्रालयात जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात मात्र त्यांनी बोलणं टाळलं.
तर दुसरीकडे पदावर असेपर्यंत धडाडीनं काम करतच राहणार असा निर्धार करत आयुक्त तुकाराम मुंढेंनी पुन्हा एकदा विरोधकांच्या तोंडचं पाणी पळवलं. एबीपी माझाच्या एल्क्लुझिव्ह मुलाखतीत मुंढेंनी निर्धार बोलून दाखवला.
संबंधित बातमी - रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे
तसंच आपल्याविषयी गैरसमज पसरवले जात असल्य़ाचा आरोपही त्यांनी केलाय. भविष्याच्या दृष्टीनं सकारात्मक बदल हवे असतील तर थोडा तोटा सहन करावाच लागेल असं सांगत बेकायदेशीर गोष्टींवर हातोडा चालवणार असल्याचंही स्पष्ट केलंय...तसंच कुठेही बदली झाली तरीही कर्तव्यदक्षता सोडणार नसल्याचंही
तुकाराम मुंढेंच्या Exclusive मुलाखतीतील 10 मुद्दे
काल नवी मुंबई पालिकेत तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव संमत केला...तसंच हा ठराव कायम ठेवण्यासाठी आज नगरसेवक मुख्यंत्र्यांची भेट घेणार आहेत.
संबंधित बातम्या