Vivo for Fifa 2022 : जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणजे फुटबॉल आणि क्रिकेट. पण क्रिकेटच्या तुलनेतही अधिक प्रसिद्ध आणि बरेच देश खेळणारा खेळ असणाऱ्या फुटबॉलचा विश्वचषक यंदा पार पडणार आहे. कतारमध्ये पार पडणाऱ्या फिफा विश्वचषक 2022 (Qatar Fifa Worldcup 2022) स्पर्धेची अधिकृत स्पॉन्सरशिप विवो कंपनीला (Vivi Company) मिळाली आहे. चायनीज मोबाईल कंपनी विवोला इतक्या मोठ्या स्पर्धेची स्पॉन्सरशिप मिळाल्याने कंपनीचे अधिकारी नक्कीच आनंदी आहेत.
विवो इंडियाचे ब्रँड स्ट्रॅटेजी संचालक योगेंद्र श्रीरामुला म्हणाले, “फिफा विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेची स्पॉन्सरशिप मिळणं विवोसाठी एक अत्यंत मोठी गोष्ट आहे. ह हे सहकार्य विवोसाठी एक निश्चित क्षण आहे. 'ब्युटीफुल गेम' असं म्हटलं जाणाऱ्या या खेळाने अनेकांना जवळ आणले आहे. या मोठ्या स्पर्धेची स्पॉन्सरशिप मिळाल्याने विवो कंपनी आणखी प्रसिद्ध होण्यास मदत होईल.''
कधी आहे फिफा विश्वचषक?
1930 साली सुरु झालेली ही जगातील एक सर्वात जुनी स्पर्धा फिफा यंदा कतारमध्ये पार पडत आहे. 21 नोव्हेंबर, 2022 पासून सुरु होणारी ही स्पर्धा जवळपास महिनाभर चालेल. तब्बल 32 देश स्पर्धेत सहभागी होतील. ग्रुप स्टेजच्या सामन्यानतर राऊंड 16 आणि मग पुढील सामने पार पडणार आहेत. 18 डिसेंबर रोजी स्पर्धेची फायनल रंगणार आहे.
आयपीएल गेली अन् फिफा आली
एकेकाळी आयपीएल स्पर्धेची स्पॉन्सरशिप विवो कंपनीकडे (Vivo IPL) होती. बराच काळ आयपीएलची स्पॉनसरशिप विवोकडे होती. पण यंदा आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी स्पॉन्सरशिप भारतीय कंपनी टाटाला (Tata IPL) देण्यात आली. एकीकडे भारत-चीन वाद असताना चायनीज कंपनी विवोला इतक्या मोठ्या भारतीय स्पर्धेची स्पॉन्सरशिप असल्यानेही टीका होती. तसच इतर व्यावसायिक कारणांमुळे बीसीसीआयने विवोकडून स्पॉन्सरशिप टाटा कंपनीला दिली. पण आता विवोला आयपीएलपेक्षाही मोठी क्रिडा स्पर्धा फिफाची स्पॉन्सरशिप मिळाली आहे.
हे देखील वाचा-
- CSK Shivam Dube : चेन्नईत आल्यावर शिवम दुबे दमदार फॉर्ममागे येण्याचं कारण काय? सुनील गावस्कर म्हणाले...
- Ravichandran Ashwin : दिल्लीविरुद्ध आश्विनची बॅट तळपली अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, राजस्थानचा पंतलाही टोला
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?