ट्विटरवर सेहवागशी पंगा नको रे ..!
भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने आता दुसरी इनिंग सुरु केली आहे. सध्या सेहवागची सोशल मीडियावर तडाखेबाज खेळी सुरु असून विरोधकांना तो चांगलेच फैलावर घेत आहे. सेहवाग कधीकधी वेगळवेगळ्या सेलिब्रिटींना ट्विटरवर त्यांच्या हटके स्टाईलने शुभेच्छा देतो, तर कधी विरोधकांची चांगलीच खिल्ली आडवतो. नुकत्याच एका ब्रिटीश पत्रकाराने वीरुशी सरळ-सरळ पंगा घेतला, सेहवागनेही आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देत त्याची बोलती बंद केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्विटरवरील सेहवागची ही नवी इनिंग त्याच्या चाहत्यांना खूपच आवडलेली आहे. ते सेहवागच्या ट्वीटला ट्रेंड करून त्याचा आत्मविश्वास वाढवत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावरील ट्रॉल अकाउंट बंद झाले पाहिजेत अशी चर्चा सध्या सुरु आहे. कारण विरोधकांना उत्तर देण्यासाठी सेहवाग पुरेसा असल्याचे म्हणले जात आहे.
तर दुसरीकडे काही फेक यूजर्स ट्रॉलकेजरीसारखे अकाउंटवरून सेहवागला ट्रॉलू असोसिएशनचे अध्यक्ष जाहीर केले आहे.
यावर सेहवागही शांत बसला नाही, त्याने मॉर्गनने रिप्लाय देताना पीटरसन अतिशय महान खेळाडू आहे, यात कोणतीच शंका नाही. मात्र, तो इंग्लडचा नाही, तर दक्षिण आफ्रिकन वंशाचा आहे. विशेष म्हणजे तुमच्या तर्कानुसार, इंग्लंडने 2007सालीच विश्व चषक जिंकणे गरजे होते. तुम्हाला आमच्यापासून आणि आमचा आनंद साजरा करण्यावर प्रॉब्लेम काय आहे असा प्रश्न विचारला आहे.
सेहवागच्या या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मॉर्गनने आणखी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने केविन पीटरसनचा उल्लेख करून, पीटरसन अजून खेळत असता. तर इंग्लंडने विश्व चषक नक्कीच कमावला असता. ज्याप्रमाणे आम्ही टी 20 चा विश्वचषक जिंकला होता, आणि पीटरसन सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
सेहवागने मॉर्गनच्या या ट्वीटला आपल्याच शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कोणत्याही लहान गोष्टीचा आनंद जल्लोषात साजरा करतो. पण तिकडे इंग्लंड क्रिकेटचा जन्मदाता असूनही अद्याप विश्वचषक जिंकू शकलेला नाही. पण तरीही हा संघ क्रिकेट खेळतो, हे दुर्दैवी नाही का? असा प्रश्न त्याने मॉर्गनला विचारला आहे.
ब्रिटीश पत्रकार पीरस मार्गनने रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने केलेल्या प्रदर्शनावर टीकेची झोड उठवणारे ट्वीट केले. त्याने आपल्या ट्वीटमध्ये, 120 कोटींची लोकसंख्या असलेल्या देशाने ऑलिम्पिकमध्ये 2 पराभवाची पदके मिळवली. त्याचा किती मोठा जल्लोष करत आहेत? हे सर्वात दुर्दैवी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -