हवेत तलवारी फिरवून नागपुरात बजरंग दलाची सशस्त्र शोभायात्रा
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2016 08:50 AM (IST)
1
गेल्या वर्षीही अशाच शस्त्र प्रदर्शनासाठी बजरंग दलाला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. मात्र यंदाही त्याची पुनरावृत्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
2
शस्त्र हवेत फिरवणे आणि त्यांचे अशाप्रकारे प्रदर्शन करणे बेकायदेशीर असल्याचं पोलिसांनी कार्यकर्त्यांना सांगितलं, तेव्हा हा प्रकार थांबला.
3
विशेष म्हणजे तलवारींसोबत काही जणांच्या हाती परशूसुद्धा होते.
4
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दरवर्षी विश्व हिंदू परिषदेतर्फे शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हातात तलवारी घेऊन भरपूर नारेबाजी केली.
5
नागपुरात बजरंग दलाने पुन्हा एकदा सर्व कायदे धाब्यावर बसवून सशस्त्र शोभायात्रा काढण्याचा प्रयत्न केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी हवेत शस्त्र फिरवून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.