नऊ थर, 40 फूट, 11 लाखांचं बक्षीस, ठाण्यात मनसेची कायदाभंग हंडी
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2016 10:15 AM (IST)
1
सर्वोच्च न्यायालयाने 20 फुटांच्यावर दहीहंडी खेळण्यास निर्बंध घातल्यानंतरही डोंबिवलीत या नियमांचं उल्लंघन झालं आहे. डोंबिवलीतल्या नव साई गोविंदा पथकाने पाच थरांचा मनोरा रचत 20 फुटांपेक्षा जास्त उंचीवर सलामी दिली.
2
नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडून 11 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे.
3
आज दहीहंडीची व्हिडिओग्राफी होणार असून पोलिस उद्या कारवाई करायची की नाही यासंदर्भात निर्णय घेतील.
4
'कायदाभंग' असं या हंडीला नाव देण्यात आलं आहे.
5
सर्वोच्च न्यायालायच्या आदेशाला न जुमानता मनसेने ठाण्यातल्या नौपाड्यात तब्बल 40 फुटांवर दहीहंडी बांधली आहे.