'कुत्ता पालो, बिल्ली पालो, गलतफैमी मत पालो...' वीरुचं पाकिस्तानी नागरिकाला चोख उत्तर!
मैदानावर स्फोटक फलंदाजी करणारा वीरु ट्वीटरच्या मैदानातही अनेकांची पळताभुई थोडी करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
त्याच्या या ट्वीटला सेहवागनंही त्याच भाषेत उत्तर दिलं. 'वर्ल्डकपमध्ये भारताला पराभूत करु हे फक्त तुम्ही स्वप्नच पाहाता. कुत्ता पालो, बिल्ली पालो, गलतफैमी मत पालो. #KulbhushanJadhav
यूएईत राहणारा पाकिस्तानी नागरिक फरहान जाहूरनं एक ट्वीट केलं, 'तुम्हाला अक्कल कमी आहे? कुलभूषणबाबत अंतिम फैसला येणं बाकी आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जा आम्ही त्याला नक्की फाशीची शिक्षा देऊ
आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालानंतर देशभरातून सोशल मीडियावर मतं व्यक्त केली जात आहे. याबाबतच भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनंही ट्वीट केलं. पण त्याच्या ट्वीटनंतर एका पाकिस्तानी नागरिकानं भारतीय नागरिक आणि कुलभूषणबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर सेहवागनं त्याच्या स्टाईलमध्ये त्या पाकिस्तानी नागरिकाला उत्तर दिलं.
‘अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही.’ असा निर्णय देत आंतरराष्ट्रीय कोर्टानं पाकिस्तानला झटका दिला आहे.