✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बॉलिवूडची आई हरपली, रीमा लागू यांचं निधन

एबीपी माझा वेब टीम   |  18 May 2017 11:04 AM (IST)
1

कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं. त्या 59 वर्षांच्या होत्या. बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रीमा लागू परिचीत होत्या.

2

3

रीमा लागू यांनी सुमारे चार दशकं चित्रपट आणि नाट्य सृष्टी गाजवली. रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलं आहे.

4

5

रीमा लागू यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं. पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे लग्नानंतर रीमा लागू या नावाने ओळखल्या जात.

6

कल हो ना हो या सिनेमात रीमा लागू शाहरुख खानच्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या

7

रीमा लागू या रिअल लाईफमध्ये संजय दत्तपेक्षा केवळ वर्षभराने मोठ्या आहेत. मात्र 'वास्तव' या गाजलेल्या सिनेमात रीमा लागू यांनी संजय दत्तच्या आईची भूमिका साकारली आहे.

8

बॉलीवूडमधील मायाळू आई म्हणूनही त्या परिचीत होत्या. ‘हम आपके हैं कौन’ या सिनेमात त्यांनी माधुरी दीक्षितच्या आईची भूमिका साकारली आहे.

9

छातीत दुखू लागल्याने त्यांना काल मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • बॉलिवूडची आई हरपली, रीमा लागू यांचं निधन
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.