मुंबई: टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतो. त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून सेहवाग अनेकांना मिश्कील शैलीत ट्रॉल करतो. आता त्यानं असंच ट्रॉल केलं आहे. पण ते देखील श्रीलंकेचा पंच कुमार धर्मसेना यालाच.


ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील सुरु असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथविरुद्ध अपील करण्यात आलं होतं. त्यावरच सेहवागनं खास ट्वीट केलं. “बस इत्ते से रह गया स्मिथ को सही फैसला देने में.. भारत और बांग्लादेश में कामयाबी के बाद…”


दरम्यान, याआधी बांगलादेश आणि इंग्लंडमधील मालिकेत कुमार धर्मसेना पंच होता.या मालिकेत धर्मसेनाने अनेक चुकीचे निर्णय दिले होते. बांगलादेश दौऱ्यात इंग्लंडचा फलंदाज मोईन अलीला धर्मसेनानं तीन वेळेस बाद दिलं होतं. पण तिनही वेळेस डीआरएसनं तो नाबाद ठरला होता.

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत धर्मसेना पंच होता. विशाखापट्टणममध्ये स्टुअर्ट ब्रॉण्डला चुकीचं बाद दिलं.